शिक्षक दिन

सर्व शिक्षक बंधूंना शिक्षक दिनानिमित्त खूप मन:पूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार 🙏

शिक्षक दिन म्हटले की मला रॉबिन विल्यम्सच्या प्रोफेसर किटींगचीच आठवण येते. असे शिक्षक मला भेटले असते तर मी एकतर चित्रकार झालो असतो किंवा छायाचित्रकार ! But I am happy that I have started searching myself again. कारण किटींग सांगतो ..
You must strive to find your own voice because the longer you wait to begin, the less likely you are going to find it at all.

“बाबुमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नही.” म्हणून अगदी सहज , साध्या शब्दात आनंद आपल्याला जगण्याचे मर्म सांगून जातो. प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणी शिक्षक म्हणून समोर येत असतो, काहीतरी नवे ज्ञान देत असतो. फक्त ते मिळवायचे असेल तर आजन्म विद्यार्थी बनून राहायची आपली तयारी मात्र हवी.

शॉ म्हणतो , ” I’m not a teacher: only a fellow traveler of whom you asked the way. I pointed ahead – ahead of myself as well as you. “

शिक्षण, विशेषत: शाळा-कॉलेजात जावून घेतलेले शिक्षण का आवश्यक आहे हे सांगताना तो म्हणतो..
“A fool’s brain digests philosophy into folly, science into superstition, and art into pedantry. Hence University education.” पण इथे विद्यापीठ, शाळा म्हणजे फक्त दगडमातीची एक इमारत एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये शॉला. तर जिथे मार्ग दाखवायला गुरु असतात, शिक्षक असतात ती विद्यादान देणारी जागा त्याला अपेक्षीत आहे.

रस्त्याने चालताना ठेच लागते तेव्हा तो दगडसुद्धा नीट बघून चाल असा धड़ाच देत असतो. पण बर्नार्ड शॉ वर विलक्षण प्रेम असून सुद्धा मला नेहमी वाटतं की सर्वक्षेष्ठ शिक्षक म्हणजे स्वानुभवच. स्वतःच्या अनुभवातून जे शिकायला मिळते ते कुठल्याही विद्यापीठात शिकता येत नाही.

आधी आई-वडील, मग गुरु, मग मित्र मंडळी, नोकरीतले, व्यवसायातले मेंटॉर्स, प्रतिस्पर्धी आणि अगदी पत्नी किंवा पतीसुद्धा एक उत्तम शिक्षक म्हणून समोर येतात. आपल्याला फक्त त्यांच्यापासुन काय घ्यायचं ते कळलं म्हणजे झालं. जगात वावरताना लोक नेहमी इतरांना , परिस्थितीला, राजकारण्याना नाहीतर नशिबाला दोष देताना दिसतात. अश्या लोकांना एकच सांगणे आहे की

“मित्रहो, स्वतःच स्वतःचे शिक्षक होवून बघा. स्वतःचे गुण-दोष शोधायला आणि पारखायला शिका. मग ही सतत तक्रारी करायची सवय आपणहुन नष्ट होवून जाईल. जगणे गाणे होईल.

शॉच्याच एका नाटकातले (Mrs Warren’s Profession) एक पात्र, विव्ही याबद्दल अगदी सहजपणे सांगून जाते..

“People are always blaming their circumstances for what they are. I don’t believe in circumstances. The people who get on in this world are the people who get up and look for the circumstances they want, and, if they cant find them, make them.”

सो मंडळी, स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हा आणि स्वतःच विद्यार्थी ! मग बघा मजा…

शिक्षकदिनानिमित्त सर्वाना याच शुभेच्छा आणि सदिच्छा 💐👍

© विशाल कुलकर्णी

यावर आपले मत नोंदवा