
नमस्कार रसिकहो,
“ऐसी अक्षरे मेळविन!” या माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.
वाचन हे आम्हा घोटीकर कुलकर्ण्यांच्या रक्तातच आहे. वाचता वाचता कधीतरी आपल्याला लिहितासुद्धा येते याचा शोध लागला. आणि मग काहीबाही लिहिणे चालू झाले. सुरुवात कवितेपासून झाली. मग हळूहळू गद्याकडेदेखील वळलो.
वृत्तपत्रात पत्रलेखन करण्यापासून झालेली सुरुवात हळूहळू ललित लेखन, परीक्षणे, रसग्रहणे करत करत कथालेखनापर्यंत येऊन पोचलोय. प्रवास चालू आहे. आपण सोबत आहातच. कुठल्यातरी अशाच एका सुक्षणी मायबोली, मीमराठी’आणि मिसळपाव या संकेतस्थळांची माहिती मिळाली.
मग मी या संकेतस्थळावर लिहायला सुरूवात केली.
मायबोली, मीमराठी तसेच मिसळपाव या मराठीला वाहीलेल्या, मराठी माणसांसाठी निर्माण झालेल्या संकेतस्थळांनी माझी लिखाणाची आवड जोपासली, वाढवली.
रसिक आणि सुज्ञ मायबोलीकर, मीमकर तसेच मिसळपाववासीयांनी माझ्या होणार्या चुका समजुन घेत लिखाणाला सदैव प्रोत्साहनच दिले. तिथे लिहीताना जाणवले की आपलं लिखाण काळाच्या ओघात कुठे वाहुन जायला नको. मग त्याला पर्यायी व्यवस्था शोधत असताना ’वर्डप्रेस’ची ओळख झाली
आणि मी इथे माझे लिखाण साठवायला सुरुवात केली. तेव्हापासून अनेक रसिक मित्रांचे प्रोत्साहन , टीका आणि कौतुक या सर्वांसमवेत हि वाटचाल चालूच आहे.
धन्यवाद.
सस्नेह
विशाल विजय कुलकर्णी
श्रीयश गार्डन, ए-१ / ४०२
मोहन नगर, धनकवडी, पुणे-४३
महाराष्ट्र, भारत.
भ्रमणध्वनि : ०९३२६३३७१४३
विरोप पता : vkulkarni.omnistar@gmail.com