Category Archives: लेख

ब्लॉग माझा – ३ स्पर्धा : पारितोषिक वितरण समारंभ ! ध्वनि-चित्र फ़िती

स्पर्धेत मिळालेले प्रमाणपत्र...
स्टार माझा वाहिनीतर्फ़े नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग ’माझा-३’ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता.  सर्वश्री लीना मेहेंदळे, विनोद शिरसाट आणि माधव शिरवळकर यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिलेल्या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २६ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
अस्मादिकांच्याही नशीबात हे कौतूक होते. धन्यवाद स्टार माझा.

ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

एक सुहद आणि नियमीत ब्लॉगर श्री. गंगाधर मुटे यांनी प्रचंड मेहनत घेवून त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले व क्लिप्स तू नळीवर अपलोड केल्या. धन्यवाद मुटेसाहेब. सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन.

सौजन्य : श्री. गंगाधर मुटे…! “मुटेसाहेबांचा विजय असो…!”

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

आम्ही ब्लॉगर्स……

" ब्लॉग माझा - ३ विजेते : सामुहिक छायाचित्र "

पुन्हा एकदा स्टार माझा आणि मुटेदादांचे मन:पूर्वक आभार आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!

विशाल.