Category Archives: प्रासंगिक

Good bye Mr. Keating…, will miss you forever !!

“We don’t read and write poetry because it’s cute. We read and write poetry because we are members of the human race. And the human race is filled with passion. And medicine, law, business, engineering, these are noble pursuits and necessary to sustain life.

But poetry, beauty, romance, love, these are what we stay alive for.

To quote from Whitman, “O me! O life!… of the questions of these recurring; of the endless trains of the faithless… of cities filled with the foolish; what good amid these, O me, O life?” Answer. That you are here – that life exists, and identity; that the powerful play goes on and you may contribute a verse. That the powerful play *goes on* and you may contribute a verse. What will your verse be?”

बहुदा १९९२-९३ चा काळ असेल तो. द्वितीय वर्षाला होतो कॉलेजच्या. नुकतंच कवितेचं व्यसन लागलेलं. आणि त्यात एके दिवशी टिव्हीवर (तेव्हा यु टिव्ही क्लासिक्स की काहीसे नाव असलेली एक वाहिनी होती, ज्यावर जुने क्लासिक्स दाखवायचे.) “डेड पोएट्स सोसायटी” पाहण्यात आला.  सहज म्हणून सुरुवातीचा थोडा वेळ टिव्ही समोर थबकलो आणि नंतर संपुर्ण चित्रपट पाहुनच उठलो…

RW

“No matter what anybody tells you, words and ideas can change the world.” असे विश्वासाने सांगणारा जॉन किटींग प्रचंड आवडून गेला. मी तर त्याच्या प्रेमातच पडलो. त्यानंतर कुठून तरी कॅसेट मिळवून (तेव्हा सीडी-डिव्हीडीचे प्रस्थ माजलेले नव्हते. व्हिडीओ कॅसेटस मिळायच्या चित्रपटांच्या) कितीतरी वेळा ’डेड पोएट्स सोसायटी’ची पारायणे झाली. आणि मग विल्यम्सचे चित्रपट शोधून पाहणे सुरू झाले. ’Good Morning, Vietnam’ मधला डी.जे. एड्रियन पुन्हा एकदा वेड लावून गेला. “Awakenings’ मध्ये त्याने रंगवलेला डॉ. सायर विलक्षण ताकदीने रॉबर्ट डि नीरो सारख्या मातब्बर कलावंतासमोर उभा राहीला आणि त्या चित्रपटार विल्यम्सच्या अभिनयसामर्थ्याची खर्‍या अर्थाने ओळख पटली. “The Fisher King” मधला त्याने  विलक्षण ताकदीने उभा केलेला, ’प्रेम’  रुपी ’होली ग्रेल’ चा शोध घेणारा ’पॅरी’  किंवा “Good Will Hunting” मधला सहुदय मानसोपचारतज्ञ डॉ. सीन मॅग्वायरला कोण विसरु शकेल?

स्टॅंड अप कॉमेडीयन म्हणुन कारकिर्दीची सुरुवात केलेल्या रॉबीन मॅक्लॉरेन विल्यम्सला १९७८-८२ दरम्यान अमेरिकन टिव्हीवर गाजलेल्या  Mork & Mindy”  या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यातला विल्यम्सने साकारलेला लव्हेबल एलियन ’मॉर्क’ रसिकांना प्रचंड आवडला. विल्यम्सने लहान मुलांसाठी सुद्धा अनेक फ़िल्म्स केल्या.  ’हुक’ (पिटर पॅन), जुमांजी,  तर त्याने आवाज दिलेली पोपाय, अलादिनचा जिनी, रॅबीट इअर्स मधला ’पिकॉस’ या पात्रांनी बाल-गोपाळांना वेड लावले…

“Mrs Doubtfire” मध्ये त्याने रंगवलेला आपल्या मुलींवर जिवापाड प्रेम करणारा, त्यासाठी म्हणून बायकोशी वाद आणि घटस्फ़ोट झाल्यावर स्वत:च्याच घरात स्त्रीरुप घेवून मुलींची आया म्हणून राहणारा प्रेमळ बाप विल्यम्सला सगळ्या जगातल्या आया-बायांच्या गळ्यातला ताईत बनवून गेला. या चित्रपटाची तर किती भ्रष्ट व्हर्जन्स आली आणि किती भाषांतून आली, याची गणतीच नाही.

552957-robin_williams_1_license_to_wed

आणि असा माणूस आज आपल्यात नाहीये. त्याने म्हणजे नैराश्याच्या आहारी जावून आत्महत्या केली. मी त्याबद्दल फ़ारसे काही बोलणार नाहीये, कारण या माणसाने , त्याच्या चित्रपटांनी मला ’जगायचे कसे? जगणे सम्रुद्ध कसे करायचे ते शिकवलेय?” त्याची अखेर अशा पद्धतीने व्हावी हे खरोखरीच खुप क्लेशकारक आहे पण….

एवढेच म्हणेन…

My dear Mr. Keating…, you taught me the game of life, will miss you forever !!

परमेश्वर… (असेलच तर) माझ्या या लाडक्या अभिनेत्याच्या आत्म्याला शांती प्रदान करो एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना !

Robin Williams : Wikipedia

Robin Williams : Filmography

विशाल….