नर्सरीत असताना बोक्याला पायलट व्हायचे होते. हे पायलटचे वेड तिच्या डोक्यात कुठून शिरले हे ही एक कोडेच. तर त्यावेळी तिला पायलट हा शब्दही निट माहीत नव्हता. क़ाय होणार म्हणून विचारले की मॅडम म्हणायच्या ‘टायलेट’ होणार.
मग एके दिवशी तिला टायलेट या शब्दाचा खरा अर्थ नीट समजावून सांगितला. त्याला टायलेट नाही तर टॉयलेट म्हणतात हे ही समजावून सांगितले. त्यांनंतर तिला कधीही विचारले कोण होणार म्हणून की बयो खोडसाळपणे हसते आणि म्हणते #टॉयलेट !
असो, तर एके दिवशी आम्ही घरात गप्पा मारत बसलो होतो. मोठ्ठी पुर्वाक्का प्रचंड हुशार आहे, एकपाठी आणि अभ्यासु आहे. ती बिचारी अभ्यास करत बसली होती. बोक्या नेहमीप्रमाणे खेळायला बाहेर पळालेला. बोलता बोलता प्रसाद (बहिणीचा नवरा) म्हणाला ,” आमची पुर्वाक्का मोठ्ठी झाली की डॉक्टर नाहीतर आय ए एस होणार. सायडीची मात्र लक्षणे काही खरी नाहीत. त्यात पायलट व्हायचे ते वेड?
पण बोक्या आहे कुठे? म्हणत मी तिला शोधत बाहेर आलो. मॅडम एका ठिकाणी ध्रुवपद मिळाल्यासारख्या बसल्या होत्या. मी विचारले, तिथे क़ाय करतेयस म्हणून?
तर म्हणे आज मी पायलटकाकांच्या जागेवर बसलेय. म्हणजे मी पायलट झालेय. तिथे मागे बसल्यावर जाम गरम होतं शाळेत जाताना. मी बाबाला सांगणार आहे..
“पायलट काकांच्या रिक्शाला एसी बसवून द्यायला”. आता कुठे मला कळलं #पायलट होण्याचं वेड कुठून आ