जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें….

किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा,
आवारगी मै हमने जमाने की सैर की !

काबे में जा के भूल गया राह दैर की,
ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !

बारावीत असेन बहुदा तेव्हा. नुकतंच उर्दुचं वेड लागलं होतं. सोलापूरातल्या सिद्धेश्वर मंदीरापाशी असलेल्या पीरबाबाच्या दर्ग्यात बंदगी अदा करणार्‍या मौलवीसाहेबांकडून जमेल तसे उर्दु शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न चालू होता. तशाच एकदा कुठल्या तरी डाळ – तांदुळ बांधुन आलेल्या पुडीच्या कागदावर वरील ओळी वाचनात आल्या आणि मी थोडा आश्चर्यातच पडलो. ज्या कुणी शायराने हे लिहीलं होतं, “कमाल की उमदा चिज लिखी थी, फिरभी दुसरा शेर मुझे हैरत में डाल रहा था ”

‘काबे में जा के भूल गया राह दैर की’ इथपर्यंत ठिक होतं, पण ‘ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !’ या ओळी मला गोंधळात पाडत होत्या. मी थेट मौलवीसाहेबांना गाठलं.

‘चचाजान, मै समझ नही पा रहा हूं, इतना उमदा कलाम लिखने वाला शख्स आखीरमें इस तरहा, क्युं शिकायत कर रहा है? काबा जाकर मंदीर की गिरिजाघर की राह भूल जाना मै समझ सकता हूं लेकीन ‘मंदीर या गिरजाघरमें जाकर किसीका ईमान खराब हो जाये’ ये बात मुझसे हजम नही हो रही है…….

मौलवीसाहब हसले आणि हसून म्हणाले, ” बेटेजी, जशी तुमची मराठी आहे ना, तशीच उर्दुही आहे. तुम्ही काढाल तितके अर्थ निघतात शब्दांतून. और यहां तो लिखनेवाला एक बहोतही उमदा शायर है ! या ओळींचा अर्थ शब्दशः घेवु नकोस रे. मंदीर किंवा गिरीजाघर हे इथे कविने मुर्तीपुजा किंवा कर्मकांडाचे प्रतीक म्हणून वापरले आहे, तर ‘कामा’ हे ‘निराकार परमेशाचे’ स्वरूप म्हणून वापरले आहे. आता इथे लिहीणारा मुस्लीम आहे त्यामुळे त्याने आपल्याला हवी तशी लिबर्टी घेतलीय एवढंच. त्याच्या जागी एखादा इतर धर्मीय शायर असता तर कदाचीत शब्द वेगळे असले असते. पण जर अर्थच काढायचा झाला तर सरसकट अर्थ असा आहे की जेव्हा निराकार स्वरूपातील ईश्वराच्या पायावर लीन झालो तेव्हा मला कर्मकांडातला, अवडंबरातला फोलपणा कळून चुकला. बरं झालं , नाहीतर भलतीकडेच भरकटत गेलो असतो.”

‘वाह, है कौन ये शायर? कोण, आहे तरी कोण हा शायर?’

“बेटेजान, ये बात तो आजतक कोई दिलपें हाथ रखकें बता नही पाया, क्योंकी कुछ लोग मानते है के ये एक ‘शायर’का कलाम है , जहां कुछ लोग ये भी मानते है की ये एक ‘शायरा’की नज्म है! लेकीन जहां तक मै जानता हूं और मानता हुं, इस शायराका असलीयतमें कोई वजुद नही है! लेकीन शायर मियाने जिस तरहसे इस किरदार को शख्सीयत दी है की शायरी के दीवाने इस किरदार को भी सच मानते है! वे आजभी मानते है की …

“हां… उमराव जान असलमें हुआ करती थी! और ये उन्हीकी नज्मके कुछ शेर है! ‘उमराव जान’के गझलोमें ‘अदा’ उनका तखल्लुस हुआ करता था, मगर जहा तक मै जानता हुं ‘उमराव जान’ ‘मिर्जा मोहम्मद हादी रुस्वा’ साहबका सबसे खुबसूरत और ताकतवर शाहकार है! और जहा तक मेरा खयाल है ये लाईनेभी मिर्झा हादी रुस्वासाहबकी ही लिखी हुयी है! ये अलग बात है की उमरावके चाहने वाले आज भी इसे ‘उमराव जान’की नज्मही मानते है!”

मी चाट पडलो. मी स्वतः “उमराव जान’ २-३ वेळा पाहीला होता. त्यातली गाणी पुन्हा-पुन्हा वेड्यासारखी ऐकली होती. खरेतर मी देखील तोपर्यंत असेच समजत होतो की ‘उमराव जान’ हे पात्र सत्यकथेवरच आधारीत आहे. खरं खोटं मिर्जा हादीसाहेबच जाणोत, पण एवढी अर्थपुर्ण शायरी करणारा हा माणूस किती ग्रेट असेल.

असो…., आज हे सगळं अचानक आठवायचं कारण म्हणजे आज सकाळी फेसबुकवर क्रांतिताईने ‘उमराव जान’ मधलं एक गाणं शेअर केलं होतं.

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें….

जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती है हमे
ये जमी चाँद से बेहतर नजर आती हैं हमे

सूर्ख फूलों से महक उठाती हैं दिल की राहे
दिन ढले यूँ तेरी आवाज बुलाती हैं हमे

याद तेरी कभी दस्तक,कभी सरगोशी से
रात के पिछले पहर रोज जगाती हैं हमे

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों है
अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे

‘शहरयार’ साहेबांच्या लेखणीतून उतरलेले जादुई शब्द, त्याला खय्यामसाहेबांचा वेड लावणारा स्वरसाज. अजुन काय हवं हो रसिकाला? शायर म्हणतो की जिंदगी, हे आयुष्य जेव्हा जेव्हा मला तुझ्या सहवासाचा लाभ मिळवून देतं, म्हणजेच जेव्हा जेव्हा मी तुझ्या सहवासात असतो तेव्हा ही धरती मला चंद्रापेक्षाही सुखकर वाटायला लागते…

या ओळी वाचल्या की मला राहून राहून ‘मोमीन्’साहेबांची आठवण यायला लागते, ते म्हणतात…

“तुम मेरे पास होते हो गोया जब.., कोई दूसरा नहीं होता ”

तसं तर ‘उमराव’ची सगळी गाणी अफाटच होती. मुळातच ‘शहरयार आणि खय्याम’ या दोन अल्लाहच्या माणसांनी या चित्रपटाच्या संगीताला खुप वरच्या स्थानावर नेवून ठेवलं होतं, त्यात रेखाचं मादक सौंदर्य, अप्रतीम अदाकारी आणि आशाबाईंचे खुळावून टाकणारे स्वर ! ‘उमराव जान’च्या संगीताने सगळे विक्रम तोडले नसते तरच नवल.

पण हे गाणं गायलं होतं मखमली आवाजाच्या “तलत अझीज”ने आणि ‘तलत अझीज’ कुठेही निराश करत नाही हे गाणे ऐकताना…!

‘सोने पें सुहागा’ म्हणजे हे गाणं ऐकताना, खासकरून पाहताना, ‘ दो घडी वो जो पास आ बैठे’ पहतानाचा अनुभव अजिबात येत नाही. उलट रेखाच्या चेहर्‍यावरचं मोहात पाडणारं लावण्य डोळे भरून पाहात राहावं की देखण्या फारुख शेखच्या बोलक्या चेहर्‍यावरचे झरझर बदलत जाणारे भाव टिपत राहावं हेच कळत नाही.

बस्स… मै अपनी बकबक बंद करता हूं और आपको कर देता हूं खय्याम साहब और शहरयारसाहब के हवाले ! जिनको गाना सुनना है वो मौसिकीकार, शायर और गझलगायक की इस खुबसुरत पेशकशका लुत्फ उठाये और जो लोक ‘शहरयार’साहबकी शायरीकें इस तिलिस्मसें बाहर निकलनेमें कामयाब हो जाये वो ‘मोहतरमा रेखा और मिया फारुख के हंसीन रोमान्स पें निसार हो जाये !

अवांतर : २००६ मध्ये जे.पी. दत्ताने ‘उमराव जान’चा रिमेक केला तेव्हा त्याने रेखाच्या सौंदर्याला पर्याय म्हणून ऐशचा वापर केला, काही प्रमाणात तो ठिक होता. (५ ते ७%), पण फारुख शेखच्या (नवाब सुलतानमियाच्या) भुमिकेसाठी अभिषेक बच्चन (?) तिथेच सिनेमाची अर्धी वाट लागली असावी 😉

विशाल….

5 thoughts on “जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें….”

  1. कालच विचार आला की बरेच दिवस विशालदा वाचले नाहीत… अतिशय सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
    बाकी उर्दूतल मला काही कळत नाही, मात्र लॉजिक लावलं तरी दुसऱ्या शेर ने बराच गोंधळ घातला… चचाजानना धन्यवाद

    Like

  2. नजाकत – ए – रेख्ता , आपण पामराने बोलू नये… म्हणून काही लिहित नाही … मस्त लिहिलयस रे, रसिकता समृद्ध करते आपल्याला !

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s