RSS

हाय काय आन नाय काय?

12 सप्टेंबर

“आता…! असा का वसवस करायलायस रंग्या?”

“ए गपे, लै श्याणी लागून ग्येली ना तू? म्हायिते मला. म्या असाच हाये. चालत आसल तं र्‍हा, नाय तर सुटायचं बघ!”

“वा रं वा, ह्ये बरीक चांगलय तुजं, तू केलं की त्यो नेम, त्यो कायदा आन आमी केली की आगळिक व्हय रं?”

“ह्ये बग रंगे, आपल्या फ्यामिलीचा मेन माणुस कोण? म्या…, मग म्या म्हणल ती उगवती , कळ्ळं?

“आरं पण… आसं कंदी आसतय का? कोंबडं वराडलं न्हाय म्हुन सुर्व्या येयाचा र्‍हातुय व्हय?”

“यिल ना, पन त्याला इच्च्यारतो कोन? जर म्या पांगरुनातून भायिरच आलु न्हाय, तर सुर्व्या आला काय आन गेला काय, काय फरक पडतु?”

“फरक कसा न्हाय पडत बाबा? त्येनं फारतर काय हुइल, तुज्या डोळ्यासमुरचा अंधार हाये तसा र्‍हायिल, पन समदं जग थोडीच थांबनार हाये तुज्यासाटनं? त्ये आपल्या चालीनं चालतच र्‍हानार, आरं येड्या, तुच मागं पडशील ना अश्यानं?”

“पडलो तर पडलो, माज्या घरात मी राजा हाये, आन र्‍हानार, पटत आसंल तर र्‍हा, न्हायतर सुट!”

“आशी कशी जाईन म्या, माजाबी हक्क हायेच की घरावर. असा कसा सोडीन म्या माजा हक्क?”

“काय करशील गं…. काय करशील?”

“सत्याग्रेव करीन, आंदोलन करीन, येळ पडल्यास त्ये काय म्हन्त्यात त्ये मरेपत्तुर उपासबी करीन!”

“गेला गं बाय… गांधीबाबाचा जमाना गेला आता. आता फकस्त गांधी टोपीचा जमाना हाये.”

“तु काय बी म्हन रंग्या, पर म्या गप न्हाय बसनार, म्या आवाज उठीवनार ह्येच्या इरोदात. असा काय मोटा गुना केला रं त्यानं? तुज्या ताकदीचा तु चुकीचा वापर केला म्हनुन त्यानं आदी नीट सांगुन बघीतलं तर तू त्येचं त्वांड बंद केलंस. घरात काय तू येकटाच कमावनारा न्हायीस, पर समद्याची कमाई जर तू येकटाच खायाला लागलास तर बाकीच्यानी काय माती खायची का काय? ”

“आस्सं बग, लोकं या घराला काय म्हंन्त्यात “रंग्याचं घर!” घराचा कर्ता पुरुष कोनाला म्हन्ताय ‘रंग्याला!’, घराचं दुखलं – खुपलं कोन बगतो “रंग्या!”

“उगा कायबी लबाड बोलु नगो रंग्या. आरं मागल्या म्हैन्यात म्हतारी मरायला टेकली तरीबी बगायला येळ न्हवता तुज्याकडं. आमी दिस-रात खपलो म्हुन म्हतारी वाचली. तवा कुटं ग्येला व्हता तुजा कुटुंबपरमुख?”

“परत्येक ठिकानी म्या लक्ष घालायाच फायजे काय? तुमची काय कामं हायेत की नाय? या चार भीतीत रायला मिळतय ना फुकाट, मग थोडा तरास जाला तर बिगडलं कुटं?”

“वा रं वा…! फुकाट म्हनं. हितं आमीबी रातंदीस राबतुया. बरं परत्येक जन आपल्या कमाईतला मोटा हिस्सा तुज्या गारीला घालतुया, त्ये काय नुसती तुजी हुकुमशाय सोसन्यासाटी व्हय रं? त्ये काय्बी चालायचं न्हाय. आता आमी बी ठरीवलय, आता आमी बी आवाज उटीवनार ह्येच्या इरोदात.”

“मुस्कटात मारीन जास्त बोलशील तर रंगे!”

“का, खरं बोल्लं तं टोचतं व्हय रं तुला?”

“घराचा मालक म्या हाये. मंग काय खरं आन काय खोटं त्ये बी म्याच ठरीवनार, कळ्ळं?”

“लै झाली तुजी मनमानी, आता आमी न्हाय खपवून गिनार ह्ये”

“आशी काय मनमानी क्येली गं म्या?”

“आता वर तोंड करुनबी तुच इच्यारतोस की? कालच्याला म्या आन गंगी बोलत हुतो, तूज्या बद्दल तर तु काय केलंस? लगेच कुनीबी आपापसात बोलाचं न्हाय म्हुन हुकुम बजावून रिकामा झालास. आता म्या तुज्या हुकुमावर आवाज उटीवला तर मला घराभायेर जायला सांगतोस न्हायत वर थोबाड बंद करीन म्हुन धमकीबी देतुस. आमी जगायचं तरी कसं मंग?”

“दुसरा कुंचा पर्याय हाये का तुमच्याकडं?”

“न्हाय कसा? समदीकडं आसतुया तसा आपल्या घरात बी हाये. आमीच तं तुला परमुख म्हुन ठरीवलाय. परत मतं टाकु, दुसर्‍याला निवडू या येळंला.”

“त्ये तेवडं सोपं न्हाय र्‍हायलेलं रंगे आता. समद्यास्नी चटक लागलीये. ज्यादा तरास न घेता जगायची. म्याच ल्यावलीये. तुजा वरडा कुनीबी ऐकनार न्हाय आता. आन कुनी ऐकलाच तर येनारा नवा मानुस पुन्यांदा नवा ‘रंग्या’ हुनार न्हाय याची काय गारेंटी?”

“म्हुन काय आमी आसंच समदं सोसत र्‍हायचं? गुमान मढ्यागत जगत र्‍हायचं?”

“बग आता तुजं तूच ठरीव म्हंजी झालं !”

****************************************************************

खरंच, आपल्या हातात आता फक्त तमाशा बघत राहणं, एवढंच राहीलय का? अधुन मधुन कुणी अण्णा, कुणी असीम थोडाफार आरडा ओरडा करतील. आम्ही ‘लाईक’ करु आणि रात्रीच्या जेवणानंतर मध्यरात्रीचा एखादा क्लासिक मुव्ही पाहून झोपून टाकु. हाय काय आन नाय काय?

विशाल..

 

7 responses to “हाय काय आन नाय काय?

 1. shradha kulkarni

  सप्टेंबर 12, 2012 at 7:42 pm

  खरंच, आपल्या हातात आता फक्त तमाशा बघत राहणं, एवढंच राहीलय का? अधुन मधुन कुणी अण्णा, कुणी असीम थोडाफार आरडा ओरडा करतील. आम्ही ‘लाईक’ करु आणि रात्रीच्या जेवणानंतर मध्यरात्रीचा एखादा क्लासिक मुव्ही पाहून झोपून टाकु. हाय काय आन नाय काय?

  +123456789…………………….

  mast lihilays vishal…

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 12, 2012 at 8:26 pm

   कधी-कधी खरंच खुप विषण्ण व्हायला होतं श्रद्धा ! आजुबाजुला पसरलेली निष्क्रियता पाहून…
   सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपणही त्या निष्क्रियतेचा एक अविभाज्य घटक असतो 😦

    
 2. vinita123

  सप्टेंबर 13, 2012 at 2:01 pm

  मला वाटते प्रत्येकाने आपल्याशी निगडित भ्रष्टाचाराचा विरोध केला तर ही स्थिति बदलेल.
  मी तरी माझ्या कामासाठी लाच देत नाही. थोडा वेळ लागतो, त्रास पण होतो पण आपल्या हक्कासाठी आवाज उठ्वायलाच हवा,

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 13, 2012 at 2:51 pm

   तर आणि तरच शक्य आहे हे. जोपर्यंत आपण वैयक्तीक पातळीवर सुरुवात करत नाही तोवर जनआंदोलनाची अपेक्षासुद्धा करणे चुकीचे आहे. मी गेली तीन वर्षे रेशन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. वडीलांच्या रेशनकार्डावर असलेले नाव काढून टाकुन माझ्या नावचे रेशनकार्ड मिळवण्याची धडपड करतोय. तसे अनेक राजकीय पक्षाचे लोक काम करुन द्यायला तयार आहेत. फ़क्त त्यांची एक चिठ्ठी जोडावी लागेल अर्जाला. पण मला ते मान्य नाही. त्यामुळे गेली तीन वर्षे (किमान सहा-सात वेळा) अर्ज केलाय, पण प्रत्येक वेळी काहीतरी कारण काढून बाद केला जातो अर्ज. त्यांना पैसे हवे आहेत, जे द्यायला मी तयार नाही. 😦
   माझ्यापरीने मी माझा सहभाग नोंदवतोय. फ़ेसबुकवर स्टेटस अपडेट करणे, भ्रष्टाचारावर चर्चा करणे यापेक्षा मला हे जास्त महत्वाचे वाटते. 🙂

    
 3. vinita123

  सप्टेंबर 13, 2012 at 4:16 pm

  वरच्या अधिकारयाला भेट ना. वरचा एखादा चांगला असतोच.
  जी कागदपत्रे जमा करतोस त्याची ओ/सी घे. ठराविक दिवसात जाउन भेट. काम नक्की होइल.
  मी तर Affidavit बनवून रेशन कार्ड काढले, तुझ्याकड़े तर कमी केलेले नाव पण आहे.

   
 4. विशाल कुलकर्णी

  सप्टेंबर 13, 2012 at 9:45 pm

  बघु . आता पनवेलच्या नव्या घरी राहायला जाइन तेव्हाच प्रयत्न करेन पुन्हा 🙂

   
 5. pravin rane

  सप्टेंबर 27, 2012 at 4:02 pm

  खर आहे जोपर्यंत आपन सगळे मिळून प्रयत्न करत नाहि तोपर्यंत हे असच चालु राहणार……

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: