मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा….
आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा..
त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो. आयटीयापाशी बसाचु आन थेट पांजरापोळ चौकात उतराचो.
एका दिशी काय जालं, आमच्या मागच्या शीटावर (म्हंजी बशीतल्या वो) दोन चिकण्या पोरी बसल्या व्हत्या. आता आमाला एक ले इचित्र सवय हाये बगा..
म्हंजी दिसलं देवाळ की जोड हात, दिसलं देवाळ की जोड हात !
पोरी जरा चालु व्हत्या, आमची खोड लक्षात आली आन त्येनी क्येलं की चालु चिडवाया. आमी देवाळ बगुन नमस्कार क्येला की त्याबी उटायच्या आन खिडकीत वाकुन नमस्कार कराच्या आन वर फ़िदी फ़िदी हासाच्या पण बगा. आमाले तर लैच कसंतरी वाटाया लागलं ना यार.
तेवड्यात काय जालं एका ष्टापवर बस थांबली. ष्टापकडं पायलं (ष्टाप कसला वो, खांबाला लटकवलेली पाटी नुसती) आमचीबी कळी खुलली (आयव मलाबी ते काव्याट्मक की काय ते लिवता अलं की)
तर ष्टापच्या म्हागं ध्यान ग्येलं आन आमी पटकनी हुबे रायलो आन झटकनी नमस्कार क्येला बगा..
तशा त्या पोरीबी हुब्या रायल्या आन त्येनी मी नमस्कार क्येला..
आता हासायची बारी आमची हुती… आमी लै (आक्षी रावणावानी) हासाया लागलो की द्येवानु…
बस हालली, पण हालता हालता पोरींना त्ये दिसलंच…
ज्येला आमी नमस्कार क्येला हुता त्यो एक बोर्ड हुता.
त्येच्यावर लिवलं व्हतं…
“सरकारमान्य देशी दारुचा गुत्ता”
पोरी अशा काय त्वांड करुन बसल्या की ज्याचं नाव त्ये! लै मजा आली राव…
तुमी बी क्येला आसलच की आसला चालुपना कंदी ना कंदी..
मंग सांगा की राव आमाला बी !
इरसाल म्हमईकर
Ashish Arage
मे 7, 2012 at 11:38 pm
खूपच छान आहे ही गोष्ट़.
Keep it up vishal.
विशाल कुलकर्णी
मे 8, 2012 at 10:19 सकाळी
आशिष, ही गोष्ट नाही, सत्यघटना आहे, मी कॉलेजच्या प्रथमवर्षाला असताना घडलेली. आभार्स 😉
नागेश... मी एक हौशी लेखक
मे 11, 2012 at 9:41 pm
एक नंबर… भासा तर लैईईईच भारी हाये… 🙂 आवडेश
विशाल कुलकर्णी
मे 12, 2012 at 11:48 सकाळी
लै लै ठांकु बर्का नागेसभौ 😉
Priya
मे 22, 2012 at 8:42 pm
हाहा
हे मी कस काय मिसलं होतं!
भारीच
मी तो प्रसंग imagine करुन हसतेय केंव्हाची!
😀
विशाल कुलकर्णी
मे 30, 2012 at 10:58 सकाळी
असे खुप किस्से आहेत चालुपणाचे आणि वेंधळेपणाचेही ! जेव्हा प्रत्यक्ष भेटू तेव्हा बोलू कधीतरी 🙂