RSS

ऐसी अक्षरे मेळविन – २०११ : एक सिंहावलोकन

02 जानेवारी

माझ्या लिखाणावर मनापासून प्रेम करणार्या माझ्या सर्व हितचिंतकांना तसेच ब्लॉग्स च्या जगातील सर्व शिलेदारांना, वाचकांना आणि मित्र-मंडळींना येणारे २०१२ अतिशय आनंदाचे, सुख-समृद्धीचे आणि सृजनशीलतेचे जावो हिच सदिच्छा !

८ नोव्हेंबर २००९ रोजी सहज गंमत म्हणुन सुरु केलेला हा ब्लॉग. मायबोलीवरील माझे लेखन वाचुन कुणा सुहदाने सल्ला दिला की तू तुझा ब्लॉग का तयार करत नाहीस? त्यावेळी आंतरजालाशी आमचा संबंध म्हणजे काकाच्या मित्राच्या मावशीच्या सासुबाईच्या सुनेच्या मैत्रींणीची लांबची मैत्रीण असा काहीसा (बादरायण की काय म्हणतात तसा) होता. मायबोली आणि मिपा या दोन मावश्याच काय त्या माहीत. मीमची नुकतीच ओळख व्हायला लागली होती. असंच कोणीतरी वर्डप्रेसची ओळख करुन दिली. दोन तास धडपड करुन ब्लॉग सुरु तर केला. त्यावेळी खरेतर ठरवले होते की ब्लॉग आपण आपल्या आतापर्यंत केलेल्या खर्डेघाशीसाठी एक स्टोरेज स्पेस म्हणून ठेवायचा. त्यामुळे ब्लॉगला नाव दिले होते ’मागे वळून पाहताना’ ! पण कालांतराने ब्लॉग कशासाठी असतो, त्याचा खरा हेतु काय हे लक्षात आलं आणि नाव बदललं…

“ऐसी अक्षरे मेळविन”!

सुरुवातीला अगदीच साधा दोन कॉलम्सचा ब्लॉग होता. इतरत्र लिहीलेल्या कथा , कविता एका ठिकाणी कुठेतरी साठवून ठेवायच्या म्हणून बनवलेली एक धान्याची कोठीच जणु. पण नंतर अनेक ब्लॉग वाचनात आले. त्यातल्यात्यात महेंद्रदादा, श्रेयाताई, जयंत कुलकर्णी, तनवीताई, अनघाताई, विभी, हेओ, भुंगा, नीरजा पटवर्धन अशा प्रतिभावंत ब्लॉगर्सचे ब्लॉग वाचनात आले आणि लक्षात आलं की आपण फ़ारच संकुचीत ध्येय ठेवलय ब्लॉगसाठी. मग त्यानंतर मात्र सर्व विषय हाताळायला सुरुवात केली. आता ब्लॉगसाठी म्हणून लिहायला लागलो. या सर्व ब्लॉगर्सच्या तुलनेत माझा ब्लॉग अजुनही तसा बाल्यावस्थेतच आहे. पण सुरुवातीपेक्षा बरीच बरी अवस्था आहे.

हळु हळु एकाचे तीन ब्लॉग झाले. कवितांसाठी वेगळा, भटकंतीसाठी वेगळा. त्यालाही या मित्रमंडळींनी मनापासून साथ दिली. जिे चुकतोय असे वाटले तिथे हक्काने कान पकडले. जिथे चांगले लिहीलेय असे वाटले तिथे हातचे काहीही न राखता मनापासुन शाबासकीही दिली. या सर्व प्रोत्साहनाचे, मदतीचे आणि कौतुकाचे पर्यावसान मागच्या वर्षी ’ब्लॉग माझा ३’ स्पर्धेत माझ्या ब्लॉगची विजेत्यांमध्ये निवड होण्यात झाले.

ब्लॉग लिहायला लागल्याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे आंतरजालावरील शेकडोच्या संख्येने मिळालेले मित्र. त्यात वरील सर्व मंडळींबरोबर सुझे, आका, सपा, नागेश देशपांडे, झंप्या, यशवंत कुलकर्णी, पंकज, रोहन असे अनेक मित्र मिळाले. त्यांच्यामुळे माझी वाचनाची क्षितीजे वाढत गेली. आज २०१२ च्या पहिल्या दिवशी या सर्व ज्ञात्-अज्ञात मित्रांबद्दल  कृतज्ञता व्यक्त करायची ही संधी घेतोय. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

वर्ष २०११ मधील माझ्या ब्लॉगचा एक धावता आढावा !

एकुण ६०,२९४ हिट्सपैकी जवळ जवळ ३३००० हिट्स एकट्या २०११ मध्ये मिळाल्यात. याचाच अर्थ २०११ हे साल माझ्या ब्लॉगसाठी रॉकींग आणि हॅपनींग ठरलेय. धन्यवाद २०११ !!

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2011 annual report for this blog.

Here’s an excerpt:

The concert hall at the Syndey Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 33,000 times in 2011. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 12 sold-out performances for that many people to see it.

Click here to see the complete report.

पुन्हा एकदा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपला,

विशाल कुलकर्णी

 

5 responses to “ऐसी अक्षरे मेळविन – २०११ : एक सिंहावलोकन

 1. गिरीश खळदकर

  जानेवारी 2, 2012 at 1:19 pm

  विशाल, मस्तच रे.
  पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

   
 2. Nagesh Deshpande

  जानेवारी 2, 2012 at 2:43 pm

  Dhanyawad….

  Vishal really nice post.
  Hope you will reach your dreamed destination in writing 🙂

  All the best for future.

   
 3. haris

  जुलै 11, 2012 at 4:53 सकाळी

  great one i like respect your eforts

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: