RSS

भारतरत्न पुरस्कार

07 एप्रिल

यावेळचा विश्वचषक जिंकल्यापासून बहुतेकांच्या ओठांवर हाच विषय आहे की आता तरी विक्रमादित्य सचीन रमेश तेंडुलकर याला “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानीत करायलाच हवे. अनेकांची अनेक मते, अनेक मतांतरे पण आजच्या लेखाचा विषय तो नाहीये. व्यक्तीश: मलाही वाटते की आमच्या लाडक्या तेंडल्याला “भारतरत्न” मिळायलाच हवे. पण सद्ध्या योग्य वेळ आहे का? एकतर सचीनची कारकिर्द अजुन संपलेली नाहीये, तो अजुनही खेळतोय. दिवसें- दिवस त्याचा खेळ बहरत चाललाय. आणि स्वत: सचीनने कित्येक विद्यापिठांच्या मानद डॉक्टरेट स्विकारायला केवळ या एका कारणापायी विनम्रपणे नकार दिलाय. आणि मग फक्त सचीनच का? हा प्रश्नही उभा राहतोच. कारण क्रीडा क्षेत्रातील सातत्याचाच विचार करायचा झाला तर अजुनही हॉकीचा जादुगर ध्यानचंद आणि बुद्धीबळाचा बादशाह विश्वनाथन आनंद यांची नावे आहेतच की? असो, त्या मुद्द्याकडे आपण नंतर येवुच.

आधी थोडे या पुरस्काराबद्दल बोलू.

काय आहे या पुरस्काराचे स्वरुप? कशाप्रकारच्या कार्यासाठी दिले जाते “भारतरत्न”?

“भारत रत्न” हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान गणला जातो.  कला, साहित्य, विज्ञान आणि लोकसेवेतील अत्युत्तम योगदानासाठी त्या त्या संबंधीत क्षेत्रातील महारथींना हा सन्मान दिला जातो.  २ फेब्रुवारी १९५४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या कारकिर्दीत भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची सुरूवात झाली. या पहिल्या पुरस्काराचे विजेते होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ! सुरूवातीला मरणोपरांत “भारतरत्न” पुरस्कार देण्याची प्रथा म्हणा, सोय म्हणा पण उपलब्ध नव्हती. (कदाचीत त्यामुळेच म. गांधींचे नाव या पुरस्कारात दिसत नाही). १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.

१९८० – मदर टेरेसा Mother Teresa (२७ अगस्त, १९१० – ५ सितंबर, १९९७)
१९८७ – खान अब्दुल गफ्फार खान  Khan Abdul Ghaffar Khan (१८९० – २० जनवरी, १९८८), प्रथम गैर-भारतीय
१९९० – नेल्सन मंडेला Nelson Mandela (१८ जुलाई, १९१८), द्वितीय गैर-भारतीय

आतापर्यंतचे भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी

१. १९५४ – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सितंबर, १८८८ – १७ अप्रैल, १९७५)
२. १९५४ – चक्रवर्ती राजगोपालाचारी (१० दिसंबर, १८७८ – २५ दिसंबर, १९७२)
३. १९५४ – डॉक्टर चन्‍द्रशेखर वेंकटरमण (७ नवंबर, १८८८ – २१ नवंबर, १९७०)
४. १९५५ – डॉक्टर भगवान दास (१२ जनवरी, १८६९ – १८ सितंबर, १९५८)
५. १९५५ – सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१५ सितंबर, १८६० – १२ अप्रैल, १९६२)
६. १९५५ – पं. जवाहर लाल नेहरु (१४ नवंबर, १८८९ – २७ मई, १९६४)
७. १९५७ – गोविंद वल्लभ पंत (१० सितंबर, १८८७ – ७ मार्च, १९६१)
८. १९५८ – डॉ. धोंडो केशव कर्वे (१८ अप्रैल , १८५८ – ९ नवंबर, १९६२)
९. १९६१ – डॉ. बिधन चंद्र रॉय (१ जुलाई, १८८२ – १ जुलाई, १९६२)
१०. १९६१ – पुरूषोत्तम दास टंडन (१ अगस्त, १८८२ – १ जुलाई, १९६२)
११. १९६२ – डॉ. राजेंद्र प्रसाद (३ दिसंबर, १८८४ – २८ फरवरी, १९६३)
१२. १९६३ – डॉ. जाकिर हुसैन (८ फरवरी, १८९७ – ३ मई, १९६९)
१३. १९६३ – डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२)
१४. १९६६ – लाल बहादुर शास्त्री (२ अक्तूबर, १९०४ – ११ जनवरी, १९६६), मरणोपरान्त
१५. १९७१ – इंदिरा गाँधी (१९ नवंबर, १९१७ – ३१ अक्तूबर, १९८४)
१६. १९७५ – वराहगिरी वेंकट गिरी (१० अगस्त, १८९४ – २३ जून, १९८०)
१७. १९७६ – के. कामराज (१५ जुलाई, १९०३ – १९७५), मरणोपरान्त
१८. १९८० – मदर टेरेसा (२७ अगस्त, १९१० – ५ सितंबर, १९९७)
१९. १९८३ – आचार्य विनोबा भावे (११ सितंबर, १८९५ – १५ नवंबर, १९८२), मरणोपरान्त
२०. १९८७ – खान अब्दुल गफ्फार खान (१८९० – २० जनवरी, १९८८), प्रथम गैर-भारतीय
२१. १९८८ – एम जी आर (१७ जनवरी, १९१७ – २४ दिसंबर, १९८७), मरणोपरान्त
२२. १९९० – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ अप्रैल, १९८१ – ६ दिसंबर, १९५६), मरणोपरान्त
२३. १९९० – नेल्सन मंडेला (१८ जुलाई, १९१८), द्वितीय गैर-भारतीय
२४. १९९१ – राजीव गांधी (२० अगस्त, १९४४ – २१ मई, १९९१), मरणोपरान्त
२५. १९९१ – सरदार वल्लभ भाई पटेल (३१ अक्तूबर, १८७५ – १५ दिसंबर, १९५०), मरणोपरान्त
२६. १९९१ – मोरारजी देसाई (२९ फरवरी, १८९६ – १० अप्रैल, १९९५)
२७. १९९२ – मौलाना अबुल कलाम आज़ाद (११ नवंबर, १८८८ – २२ फरवरी, १९५८), मरणोपरान्त
२८. १९९२ – जे आर डी टाटा (२९ जुलाई, १९०४ – २९ नवंबर, १९९३)
२९. १९९२ – सत्यजीत रे (२ मई, १९२१ – २३ अप्रैल, १९९२)
३०. १९९७ – अब्दुल कलाम (१५ अक्तूबर, १९३१)
३१. १९९७ – गुलजारी लाल नंदा (४ जुलाई, १८९८ – १५ जनवरी, १९९८)
३२. १९९७ – अरुणा असाफ़ अली (१६ जुलाई, १९०९ – २९ जुलाई, १९९६), मरणोपरान्त
३३. १९९८ – एम एस सुब्बुलक्ष्मी (१६ सितंबर, १९१६ – ११ दिसंबर, २००४)
३४. १९९८ – सी सुब्रामनीयम (३० जनवरी, १९१० – ७ नवंबर, २०००)
३५. १९९८ – जयप्रकाश नारायण (११ अक्तूबर, १९०२ – ८ अक्तूबर, १९७९), मरणोपरान्त
३६. १९९९ – पं. रवि शंकर (७ अप्रैल, १९२०)
३७. १९९९ – अमृत्य सेन (३ नवंबर, १९३३)
३८. १९९९ – गोपीनाथ बोरदोलोई (१८९०-१९५०) , मरणोपरान्त
३९. २००१ – लता मंगेशकर (२८ सितंबर, १९२९)
४०. २००१ – उस्ताद बिस्मिल्ला ख़ां (२१ मार्च, १९१६ – २१ अगस्त, २००६)
४१. २००८ – पं.भीमसेन जोशी (४ फरवरी, १९२२ – )

यापैकी मदर तेरेसा जरी विदेशी असल्या तरी त्यांनी भारतीय नागरिकत्व स्विकारलेले होते. तर खान अब्दुल गफ्फारखान (खिलाफत चळवळीचे संस्थापक) हे पाकिस्तानी नागरिक होते. या तिघांपैकी सद्ध्या हयात असलेले दक्षीण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला हे दुसरे अभारतीय भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत.

इथे अजुन एक गोष्ट नमुद कराविशी वाटते जिला आपले दुर्दैव म्हणायचे का या पुरस्काराचे दुर्दैव म्हणायचे तेच कळत नाहीये. १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. कुणा मुर्खाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. व सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेण्यात आला. आपल्या इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना असावी. एक गोष्ट मला कधीच समजली नाही. जर नेताजींच्या मृत्युचा पुरावा मिळाला नव्हता तर एक ते हयात आहेत असे गृहीत धरून त्यांना हा पुरस्कार का दिला गेला नाही? हयात व्यक्तींना ‘भारतरत्न’ दिले जावू नये असा तर कुठला कायदा नव्हता आणि नाही ना? नेताजींच्या प्रखर राष्ट्रभक्तीबद्दल आणि या देशाच्या स्वातंत्रासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाबद्दल कुणाचेच दुमत नसावे. असो, आपल्या राजकारण्यांचे हे घाणेरडे राजकारण अजुन किती जणांच्या बलिदानावर पाणी फिरवणार आहे कुणास ठाऊक?

मायबोलीवरील एक मित्र श्रीयुत नितीन बारगे यांच्या मते …. वरील यादीत मोरारजी देसाई यांचे नाव खटकत नाही का कोणालाही? तसेच अमर्त्य सेन यांचे देखील? (अमर्त्य सेन यांनी सांगितले होते ते भारतवंशीय आहेत भारतीय नाहीत)

मला तर राजीव गांधी यांचे नावदेखील आवडले नाही या यादीत. इंदिरा गांधी का आहेत या यादीत? देशाला आणीबाणीची खरच गरज होती का? केवळ सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी आणीबाणी लादली, जी केवळ अंतर्गत अनागोंदी आणि युद्धजन्य परिस्थिती यामध्ये वापरावी असे घटनेत लिहिले आहे. शिखांचे हत्याकांड देश विसरतो कसा?(मी इंदिरा गांधी यांच्या हत्येआधीच्या आणि नंतरच्या दोन्ही बाबतीत बोलत आहे) जर ते चुकीचे होते तर इंदिरा गांधी यांना भारत रत्न का मिळावे? जर चुकीचे नवते तर कॉंग्रेस त्या हत्याकांडाबद्दल देशाची माफी का मागतो?
(तसेच सरदार पटेल आणि डॉ आंबेडकर यांना फार फार उशिरा हा पुरस्कार मिळाला याचे देखील दुखः वाटते)

आता थोडेसे या पुरस्काराच्या स्वरुपाबद्दल……

अगदी सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजुवर मधोमध सुर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहीलेले असे व सुर्याच्या खालील बाजुस एक फुलांची माळ असावी.  तसेच पदकाच्या दुसर्‍या बाजुस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले. सद्ध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजुला मधोमध सुर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसर्‍या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे.

भारतरत्न पुरस्कार !

हा पुरस्कार मिळवणार्‍यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये स्थान मिळते.

आता मुद्द्याकडे वळु या, कस्से?

आपल्या सचीनला ’भारतरत्न’ मिळायला हवे की नको? तो खरोखर या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आहे की नाही?

सद्ध्या मुद्दा आहे तो सचीनला ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा की नाही हा. आणि मिळाल्यास सचीनच का? इतर कुठल्या खेळाडूला का नाही. उदा. विश्वनाथन आनंद किंवा ध्यानचंद. हा प्रश्न उपस्थित करणार्‍यांसाठी माझे काही बेसिक प्रश्न आहेत. मला वाटतं त्या प्रश्नांच्या उत्तरातच या प्रश्नाचेही उत्तर दडलेले आहेत.

इथे मी स्पष्टपणे नमुद करू इच्छितो की हे प्रश्न देखील मायबोलीकर श्री. नितीन बोरगे यांनीच मांडलेले आहेत आणि मला पुर्णपणे पटले आहेत, म्हणून त्यात फारसा बदल न करता मी ते प्रश्न इथे मांडतोय.

नितीन बोरगे | 4 April, 2011 – 22:05

सचिन व्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रामध्ये भारतरत्न मिळण्यासाठी योग्य अशा दोनच व्यक्ती आहेत, ध्यानचंद आणि विश्वनाथन आनंद. बाकी सर्वांच्या कारकीर्दीमध्ये consistency नाही आहे. एक दोन पदक मिळवली कि पुढच्या स्पर्धेत सर्व आनंदच आहे. त्याने आपल्या क्षेत्रातील सर्व उच्चांक मोडले आहेत. वर लोक जी खेळाडूंची लिस्ट देत आहेत, त्यापैकी कोणी आहे का की ज्याने जागतिक पातळीवर आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे ?

आणि ह्या व्यतिरिक्त इतर अनेक गुण आहेत सचिनमध्ये

१) त्याची सामाजिक बांधिलकी सर्व खेळाडूमध्ये श्रेष्ठ आहे.
२) तो २०० अनाथ मुलांचा सर्व खर्च आपल्या पदरामधून करतो
३) त्याचे सामनावीर आणि मालिकाविराच्या अवार्डचे सर्व पैसे वानखेडेच्या ग्राऊंड्समन ला जातात.
४) खेळताना बाद झाल्यावर पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतः मैदानाबाहेर चालायला लागून तो समाजापुढे प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवतो.
५)कित्येक NGO चा पुरस्कर्ता आहे
६) कर्करोग झालेल्या मुलांच्या मदतीसाठी वैयक्तिक आणि सामाजिक आवाहन करून सुमारे सव्वा कोट रुपये जमा करून दिले आहेत
७) केवळ एक रणजी सामना बरोबर खेळलेल्या मित्राचा सर्व वैद्यकीय खर्च उचलतो
८) GIDF चा सदस्य आहे
९) सर्व सामाजिक जाहिरीती फुकट करतो.
१०) पाणी कसे वाचवायचे याचे उदाहरण स्वतः घालून देतो.
११) ब्रिटीश गुलामगिरीचे प्रतिक म्हणून ब्रिटनचा सर्वोच्च सर हा पुरस्कार नाकारतो. केवळ सचिनव्यतिरिक्त कोणाला हा पुरस्कार मिळावा ह्यापेक्षा सचिनला का मिळू नये ह्यावर कोणी मतप्रदर्शन करेल का? मायबोलीवरील आपल्या श्री. सुधीरकाका काळेंच्या एका पोस्टवर नितीनजींनी मांडलेले हे मत आहे.

मायबोलीवरील धाग्याचा दुवा :

मंडळी यापैकी बरीचशी माहिती विकीपिडियावरून साभार घेतलेली आहे तर काही माहिती मायबोलीवरून.

विशाल कुलकर्णी

 

5 responses to “भारतरत्न पुरस्कार

 1. sjpandit

  एप्रिल 7, 2011 at 8:17 pm

  nice post still i dont know abt sachin but know i know all things thanks …………………ur post r really valuable for marathian thanks am regular reader of ur blog……keep posting

   
  • विशाल कुलकर्णी

   एप्रिल 7, 2011 at 11:36 pm

   Thanks buddy! I dont understand ur statement..”Still i dont know abt sachin”
   what do you mean to say?

    
   • sjpandit

    एप्रिल 14, 2011 at 4:52 pm

    i mean all rounderness out of ground for social work

     
   • विशाल कुलकर्णी

    एप्रिल 15, 2011 at 10:10 सकाळी

    ओह, मग ठिक आहे. मी थोडासा गोंधळलो होतो. सचीनबद्दल माहीती नसणारा माणुस तसा विरळाच नाहीका? 🙂

     
 2. Mandar Kulkarni

  एप्रिल 11, 2011 at 5:01 pm

  Nice post….very informative.keep posting

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: