RSS

कर्मयोगी

12 जानेवारी

आज १२ जानेवारी…..

“उठा, जागृत व्हा, ध्येयप्राप्ती होइपर्यंत थांबू नका” असा संदेश देणारे महान कर्मयोगी स्वामी श्री विवेकानंद यांची जन्मतिथी !

स्वामीजी

Sisters and Brother of America….

अशी पहिल्या चार -पाच शब्दात पाश्चांत्यांना जिंकून घेणारे त्यांचे शिकागो येथील धर्मपरिषदेत जगभरातील धर्म प्रतिनिधी तसेच विचारवंतांना उद्देशुन केलेले जगदविख्यात स्वागतीय भाषण…. (ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा )

सौजन्य : यु ट्युब

त्यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद : सौजन्य : मेधा सकपाळ यांच्या सृजनपालवी या ब्लॉगवरील स्वामींजीवरील या लेखाचा काही भाग !

भाषण पहिले – स्वागतास उत्तर

” अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूनो,

…… याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की, “दूरदूरच्या देशांतून आलेले हे प्रतिनिधी, सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे म्हणून गौरवास पात्र होत यात काहीच संशय नाही. ” या व्यक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगाताला ‘सहिष्णुता’ आणि ‘सर्वच मतांना मानणे’ या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो.. अन्यधर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असे नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आनी धर्माच्या निराश्रितांना ज्या धर्माने सर्वदा आश्रय दिला आहे त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच धर्माने त्यांना सादर हृदयाशी धरले, हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी धर्माच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे पालन करत आहे, त्याच सनातन धर्मात मी जन्मास आलो आहे.

….. ” रूचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम ।
नृणां एको गम्यः त्वमसि पयसां अर्णव इव ॥ “
अर्थ –
” भिन्न भिन्न उगमातून निघणारे जलप्रवास ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व पथिक, प्रभो, अंती तुलच येऊन मिळतात.”

…… पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाणून काढली आहे. संस्कृतीचा विध्वसंस करुन त्यांनी कधीकधी राष्टंच्या राष्ट्रं हताश करुन सोडली आहेत.. हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता.. पण आता त्यांचीही घटका भरत आली आहे..आणि मला अशी उत्कट आशा वाटते की, या धर्मपरिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःकाळी निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणा-या सर्व प्रकारच्या छळाची, आणि एकाच लक्ष्याकडे आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तींतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यूघंटाच ठरेल..

मेधाताईंच्या ब्लॉगचा दुवा : सृजनपालवी

त्या महान द्रष्ट्या, कर्मयोग्याला शतशः प्रणाम !

विशाल कुलकर्णी

 

10 responses to “कर्मयोगी

 1. नरेंद्र प्रभू

  जानेवारी 12, 2011 at 5:24 pm

  नमस्कार, स्वामी विवेकानंद हे माझेही दैवत आहे. आजचा त्यांचा जन्मदिन युवकदिन म्हणूनही साजरा केला जातो. स्वामीजींच्या शिकागो इथल्या भाषणाची लिंक दिल्याबद्दल आभारी.
  शेवटच्या वाक्यातला ‘द्वेष्ट्या’ हा शब्द ‘द्रष्ट्या’ असा हवा.

   
 2. महेंद्र

  जानेवारी 12, 2011 at 5:53 pm

  भाषण फार पूर्वी वाचले होते. धन्यवाद.. पुन्हा वाचतो आता एकदा.

   
 3. Hrushikesh

  जानेवारी 12, 2011 at 7:01 pm

  Stand as a Rock;you are indestructible. You are the self, the God of the universe.
  Vivekanand jayanti chya Hardik Shubhecha.

   
 4. Mohini

  जानेवारी 13, 2011 at 1:56 सकाळी

  Happy National youth day! Vishal! About the link oh Swmiji’s speech …. I have queried to Ramakrishna Mission…… unfortunately….no recording is available of Swamiji’s voice…. Please don mind but …..this video is fake i guess

   
 5. Mohini

  जानेवारी 13, 2011 at 2:09 सकाळी

  BTW! Thanks a lot for the Beautiful Translation of the speech! 🙂

   
 6. muktanand

  जानेवारी 20, 2011 at 8:17 pm

  aaj solapur la aalo aahe dwarakanagar la aalo hoto aaj sampoorna blog vachun kadhala khupach chhan aahe

   
  • विशाल कुलकर्णी

   जानेवारी 24, 2011 at 12:13 pm

   धन्यवाद रे, सगळे व्यवस्थित पार पडले ना? यावेळेसही नेमके आपण हैदराबादमध्ये भेटु शकलो नाही 😦

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: