RSS

मराठी पाऊल पडते पुढे

24 Dec

मायबोलीवरील एक जवळचे मित्र श्री. कौतुक शिरोडकर यांनी नुकतेच विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांची टीम जॉइन केली आहे. श्री. देसाई एक नवीन शो घेवुन येताहेत ” मराठी पाऊल पडते पुढे..”.

अंगी काही ना काही गुण, कला असणाया पण संधी न मिळालेल्या, सगळ्या मराठी कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर…. प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर… , या आवाहनाला प्रतिसाद द्या. आपल्या आत कुठल्यातरी कोपर्यात दडुन बसलेल्या कलावंताला बाहेर आणण्याची ही सुरेख संधी आहे. सोडू नका. उचला फ़ोन आणि लागा तयारीला…

सर्व ब्लॉगर मित्रांना एक कळकळीची विनंती, शक्य असेल तर आपापल्या मित्रांपर्यंत हे आवाहन पोचवा. आपल्या ब्लॉगवर जर आपण हे आवाहन प्रकाशित करु शकलात तर खुपच छान. जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत ही संधी पोहोचायला हवी.

आवाहन:

नमस्कार मित्रहो !

फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ‘ श्रीप्रसाद क्षीरसागर’ अशी फोनवर ओळख दिली तेव्हा ” कोण ? ” हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.

आता नमनानंतर मुद्द्यावर येतो. ” आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ” ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्‍या मराठी कलाकाराच्या शोधात. “झी मराठी” सोबत हा प्रवास सुरु होतोय “मराठी पाऊल पडते पुढे” या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर…. प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर… श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर… “ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला”.

तुम्ही काहीही वेगळं करत असाल… गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही…. आग़ळं वेग़ळं अस काहीही…. त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय…

३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१
२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०
४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०
५ जानेवारी कोल्हापूर – ” – -” –
६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३
८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००

ईमेल – shabashmaharashtra01@gmail.com

तर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्‍या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.

मायबोलीवरील आवाहनाचा दुवा

तुमचाच
कौतुक शिरोडकर

******************************************************************************************

आपल्या आत कुठल्यातरी कोपर्यात दडुन बसलेल्या कलावंताला बाहेर आणण्याची ही सुरेख संधी आहे. सोडू नका. उचला फ़ोन आणि लागा तयारीला…

विशाल कुलकर्णी

 

2 responses to “मराठी पाऊल पडते पुढे

  1. GOPAL

    मार्च 7, 2011 at 3:35 pm

    ha programme khup changala ahe
    ha programme marathi mansat cyatanya nirman karato

     

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: