RSS

राष्ट्रकुल स्पर्धा दिमाखात संपन्न…. आता पुढे काय?

15 ऑक्टोबर

राष्ट्रकुल स्पर्धा २०१० : नवी दिल्ली

गेले कित्येक महिने वेगवेगळ्या कारणाने गाजत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा काल संपल्या. ३८ सुवर्णपदके आणि एकुण १०१ पदके कमावून भारताने पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. आजपर्यंतचे राष्ट्रकुल स्पर्धेतले आपलीच विक्रम मोडत भारताने स्वतःपूरता नवीन विक्रम प्रस्थापित केला. मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने ३० सुवर्णपदके मिळवली होती, यावेळी ३८ सुवर्णपदके मिळवत भारताने आपलाच जुना विक्रम मोडला.

या राष्ट्रकुल स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने गाजल्या. साधनसामुग्रीच्या खरेदी व्यवहारात राष्ट्रकुलमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीला आल्याने सुरेश कलमाडी गोत्यात आले.

निर्लज्ज यंत्रणा !

त्यात पुन्हा स्पर्धा १५ दिवसावर आल्या तरी राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी अपूर्णावस्थेत असल्याचे उघडकीस आले. या स्पर्धेसाठी उभारलेल्या खेलग्राममध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे सिद्ध झाले. सगळीकडे असलेले अस्वच्छतेचं साम्राज्य पाहुन माइक फेनेल यांनी तिव्र स्वरात नाराजी व्यक्त केली. इथेही पुन्हा सुरेश कलमाडी टार्गेट.

एवढ्यावरच पुरेसे नव्हते म्हणुन की काय राष्ट्रकुलसाठी उभारण्यात आलेल्या खेलग्राममध्ये साप सापडला , त्यात दिल्लीत डेंग्युची साथ सुरू झाली, राजधानीत फ्लायओव्हर कोसळला. अनेक देशांनी आपले खेळाडू दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेला पाठवण्याचे सुरक्षेच्या कारणास्तव रहीत केले. या सगळ्यामुळे कलमाडींवर देशाची लाज घालवल्याचा आरोप झाला. शेवटी पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागले. एवढ्या सगळ्या उलाढालीनंतर राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या आणि अतिशय यशस्वीपणे पार पडल्या.

राष्ट्रकुल स्पर्धा २०१० : स्टेडीयम

राष्ट्रकुल २०१० : सांगता समारंभ

पण आता पुढे काय……

दिल्लीतल्या खेलग्रामची अवस्था पुण्यातल्या क्रिडानगरीसारखीच होणार काय?

या भव्य स्पर्धेचे समालोचन करण्याची संधी मिळाले “पंकज आठवले” मटाशी बोलताना म्हणतात………

राष्ट्रकुलकरता बांधण्यात आलेल्या स्टेडियमचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं. मुंबईत किंवा देशभरात सकाळी आपल्या दिवाणखान्यात चहाचा घोट घेत पेपरमध्ये या स्टेडियमच्या दुर्देशबद्दल आपण वाचत होतो , पण माझा अनुभव मात्र वेगळा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दर्जाची अशी स्टेडियम्स म्हणजे वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. याकरता प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. काही ठिकाणी त्रुटी असतीलही पण यामुळे संपूर्ण मेहनतीकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. ही अप्रतिम स्टेडियम बघितल्यावर माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की राष्ट्रकुलनंतर या स्टेडियम्सचा वाली कोण ? नुकत्याच आफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषकानंतरही स्टेडियमचा प्रश्न निर्माण झाला होता , त्यामुळे इतक्या मेहनतीने तयार केलेल्या चांगल्या स्टेडियमचं राष्टकुलनंतर काय हा प्रश्न आहेच.

खरोखर हा प्रश्न खुप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडे असा इव्हेंट संपून गेला की त्या सगळ्या वास्तुकामाकडे प्रचंड दुर्लक्ष केले जाते कारण त्यातून मिळणारा मलिदा आधीच ओरबाडून झालेला असतो. पुण्याच्या “बालेवाडी क्रीडानगरीची” सद्ध्याची दयनीय अवस्था याचा मुर्तीमंत पुरावा आहे. तेव्हा यातून प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सरकारी यंत्रणा बालेवाडीच्या उदाहरणातून योग्य तो बोध घेवून दिल्लीतील खेलग्रामची भविष्यातही निगा राखतील काय? की त्याचीही अवस्था बालेवाडी क्रीडानगरीसारखीच होइल?

आता पुढे काय...?

तुम्हाला काय वाटतं?

संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स

विशाल कुलकर्णी

 

7 responses to “राष्ट्रकुल स्पर्धा दिमाखात संपन्न…. आता पुढे काय?

 1. प्रसिक

  ऑक्टोबर 15, 2010 at 12:50 pm

  कल्लू आणि कंपनी ला म्हणाव आता देशात ओलम्पिक चे सामने भरावा, आणि त्यावर ७००,००० करोड खर्च करा, पैशाची काही काळजी नका करू, TAX भरायला आम्ही आहोतच

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 15, 2010 at 12:59 pm

   काळजी करु नका प्रसिक ! तेच होणार आहे…
   कल्लु नसेल तर दुसरा कोणीतरी येइल..पन या भ्रष्टाचाराला अंत नाही. आपण आहोतच ना टॆक्स भरायला? 😉
   आभार. 🙂

    
 2. महेंद्र

  ऑक्टोबर 15, 2010 at 3:34 pm

  ऑलंपिक साठी ,दूसऱ्या कलमाडिचा उदय होणार आता लवकरच.. आपण आहोतच टॅक्स भरायला.

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 15, 2010 at 3:37 pm

   कलमाडी खुप आहेत हो आपल्याकडे. मुळात कलमाडी हेच क्लोन वर्जन आहे पवारसाहेबांचं 🙂

    
 3. आर्थिक स्वातंत्र्य

  ऑक्टोबर 15, 2010 at 4:15 pm

  तुमचा लेख वाचल्यानंतर बाजूला संस्कृत dictionary ची लिंक सापडली. ती उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार.

   
 4. सतिश

  जानेवारी 30, 2011 at 12:58 pm

  कलमाडीना शिक्षा कधी होणार ?आणि भारतमाता कधी भ्रष्टाचार मुक्त होणार

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: