RSS

कबीर – सत्याचा आरसा

15 जून

संत कबीर …., हा माणुस मला नेहमीच कोड्यात पाडत आलेला आहे. त्याच्या प्रत्येक दोह्यातून इतके वेगवेगळे अर्थ निघतात किं आपण अचंभित होवून जातो. जगणं शिकवणारा, जगणं समृद्ध करणारा हा माणुस.

काही दिवसांपुर्वी श्री. राहुल देशपांडे यांच्या आवाजाने नटलेला “कबीर बानी” नावाचा सुंदर अल्बम बाजारात आला आहे. त्या संदर्भाने http://www.mimarathi.net  या मराठी संस्थळाचे चालक-मालक श्री. राजे उर्फ़ राज जैन यांनी मी मराठीवर एक सुंदर लेख लिहीला होता. त्यात कबिराचे काही दोहे त्यांनी अर्थासकट दिले आहेत. त्याच्या प्रतिसादातही काही रसिक वाचकांनी काही अतिशय सुंदर दोहे उद्धृत केले आहेत. ते त्यांच्या (राजे आणि रसिक वाचक) परवानगीने जसेच्या तसे इथे प्रकाशित करतो आहे.

राहुल देशपांडेंचा “कबीर बानी” कुणाला हवा असल्यास मी मराठीवर विक्रीसाठी (ऒनलाईन) उपलब्ध आहे. इच्छुकांनी खालील दुव्यावर टिचकी मारुन पाहायला हरकत नाही.

मीम वरील राजेंचा मुळ लेख

कबीर बानी : म्युझिक फ़ॊर सोल (ऒनलाईन खरेदी)

लेखक : श्री. राज जैन

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.

ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥

कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥

माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥

साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥

जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥

उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥

सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥

साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥

काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

वाह !

इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.

जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥


देवा, मला एवढं मिळू दे की ज्यामध्ये माझ्या गरजापुर्ण होतील व घरी येणारा अगंतूकाची मी निट सेवा करु शकेन. अती देऊ नकोस ज्यामुळे मला घमंड होईल व कमी देखील नको देऊ की ज्यामुळे माझ्या घरी आलेल्या अगंतुकाची मी सेवा ना करु शकेन.

अर्धवट यांचा प्रतिसाद

मुल्ला बनके बांग पुकारे, वो क्या साहीब बहीरा हैं।
चुंटी के पग घुंगरू बांधे, वो भी अल्ला सुनता हैं॥

सोना यांचा प्रतिसाद

गुरु गोविंद दोउ खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो मिलाय ॥

देव आणि गुरू दोघे एकावेळी समोर उभे राहिले
कोणाच्या प्रथम पाया पडावे हा प्रश्न पडला
तेव्हा गुरूचे प्रथम स्मरण केले कारण
त्यानेच देव दाखवायला मदत केली.

पराग यांचा प्रतिसाद…

अबिदा आणि जगजित सिंग यांच्या आवाजतिल कबिराचे दोहे ऐकण्यासारखे आहेन . ते ऐकले कि शांत वाटते

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना, तो मुझसे बुरा न कोय

लालि मेरे लाल कि, जित देखु तित लाल
लालि देखन मै गयि, मै भि हो गयि लाल

सुखिया सब संसार है , खाये ओर सोये
दुखिया दास कबिर है, जागे ओर रोये

यावर पिडांकाकांनी मनापासुन दिलेला प्रतिसाद….. (जो कुणालाही पटेल)

by पिवळा डांबिस – 14/06/2010 – 07:13

राजे, तुम्ही आमच्या मर्मबंधातल्या ठेवीलाच हात घातलात की हो!!!
आज एक गुपित सांगतो,
आमचं माध्यमिक (८-१०) आणि हुच्च माध्यमिक (११-१२) वीला हिन्दी होतं! तेहि हायर हिन्दी!!!
कॅन यु रियली बिलिव्ह दॅट!!!
हास्य
त्या वेळेस एका तिवारीशास्त्रींच्या पायाशी बसून बरंच जमेल तसं अध्ययन केलं! तुलसीदास, सूरदास, कबीर आणि इतरही!!!
लेकिन दिल चुरा लिया तो कबीरजीने!!!!
(इसलिये महारास्ट्र के लोग हमें माफ कर दें — जयाबाईंच्या माडीवर शिकलेला डायवलॉक!!!)
हास्य
असो,
तुम्ही इथे कबिराचे दोहे देताय, मस्त गोष्ट आहे!
पण एक करा….
त्यांचा अर्थ द्यायची गुस्ताखी करू नका….
कबिराचे दोहे, ते तुम्हीच म्हटलंत तसेच आहेत, आपापल्या मनाचा आरसा!!!

आम्ही तुम्हाला आमचे मित्र मानतो म्हणून हे स्पष्ट लिहीलं, राग नसावा!!

कबिराच्याच शब्दांत सांगायचं तर…
“ऐसी दोस्ती न कीजिये, जैसे खीरा(काकडी)ने कीन
बाहरसे तो मिले हुये, भीतर फांके तीन!!!”
हास्य

आपला,
पिडांआजोबा.

(नोट टू मायसेल्फः कधीतरी एकदा कबिराचे दोहे आणि आयुष्यात आलेले अनुभव यावर लिहायला पाहिजे!! wink )

अजुनही जसजसे वाचकांकडुन दोहे जमा होत जातील तसे ते इथे ऎड करत जाईन. 🙂
राजे, हा सुंदर लेख शेअर केल्याबद्दल आणि माझ्या ब्लॊगवर टाकायची अनुमती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेल्या संत कबीराच्या काही रचना (यु ट्युब दुवे) इथे ऐका-पाहा.
विशाल कुलकर्णी.
 

3 responses to “कबीर – सत्याचा आरसा

 1. raj jain

  जून 15, 2010 at 1:00 pm

  gr8 !

  🙂

  thank you mitraa !

   
  • विशाल कुलकर्णी

   जून 15, 2010 at 1:03 pm

   राजे, तुम्ही कसले आभार मानताय. ते तर मीच मानायला हवेत. खुप खुप आभार.

   विशाल

    
 2. Adv.Ashok Tupke

  मार्च 28, 2013 at 5:44 pm

  kadwa sach aur wastvta jo batane ki himmat kabirgi rakhte hai jo bahut kam hastiome hoti hai.

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: