RSS

हिंदु हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांची काही गाजलेली भाषणे

13 ऑगस्ट

हिंदु हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांची काही गाजलेली भाषणे

संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स – ई विशेषांक (झंझावात – बाळासाहेब वाढदिवस विशेष)

Tuesday, October 15, 2002 11:44:10 pm 

स्थळ : शिवाजी पार्क, दादर

तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप असून ती उडाली नाही तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. तुमच्यामध्येसुद्धा अतिरेकी निर्माण झाले पाहिजेत. नुसत्या मुठी आवळून भडकून चिडून ते होत नाही तर त्यासाठी बलिदान करावे लागते.

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : दहशतवादाच्या विरोधातील कचखाऊ धोरणाबद्दल वाजपेयी सरकारवर घणाघाती टीका करतानाच , उद्यापासून देशाला हिंदुराष्ट्र म्हणून संबोधण्यास सुरुवात करण्याचे तसेच हिंदुत्वाचा ज्वलंत विचार घेऊन इस्लामशी टक्कर देण्यास सज्ज होण्याचे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी येथे केले.

शिवाजी पार्कवर शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात अतिशय आक्रमक भाषण करताना ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार प्रखरपणे मांडला. हे विचार आचरणात आणण्यासाठी वेळप्रसंगी बलिदानास सज्ज राहण्याचे साकडेही त्यांनी शिवसैनिकांना घातले.

‘ काश्मीरच्या निवडणुका झाल्या. आता सीमेवरचे सैन्य काढून घेण्याचा विचार सुरू आहे. हा मूर्ख विचार कोणाचा आहे ‘, असा सवाल बाळासाहेबांनी केला. ‘ सीमेवर सैन्य असताना देशात अतिरेकी घुसतात हे कसले लक्षण आहे ? शत्रूराष्ट्राच्या धोक्यापेक्षा देशात घुसलेल्या अतिरेक्यांचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे. चार कोटी बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्या ,’ असे ठाकरे यांनी सांगितले.

‘ गोध्रा , अक्षरधाम , काश्मीरमधील अतिरेक्यांच्या कारवाया पाहिल्या की संताप येतो. अक्षरधाममध्ये तर केवळ दोघांनी घुसून सा-या देशाला वेठीस धरले. तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप असून ती उडाली नाही तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. तुमच्यामध्येसुद्धा अतिरेकी निर्माण झाले पाहिजेत. नुसत्या मुठी आवळून भडकून चिडून ते होत नाही तर त्यासाठी बलिदान करावे लागते ‘ , असे भावनिक आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

दहशतवाद्यांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारला अपयश आल्याबद्दल टीकेची झोड उठविताना बाळासाहेब म्हणाले की , सीमेवर सैन्य असताना अतिरेकी घुसतात. पंतप्रधानांचा सतत परदेश दौरा चालू असतो. ‘ हम बर्दाश्त नही करेंगे , सहनशक्ति का अंत हुआ , अब आरपार की लड़ाई होगी ‘ , या वाजपेयींच्या विधानांचा उल्लेख करीत काहीच होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘ भारतात बहुसंख्य हिंदू असताना हिंदू राष्ट्र जाहीर करण्याची परवानगी कशाला मागता ? उद्यापासून हा देश हिंदुराष्ट्र असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा. आमच्या धर्माचा मान राखलाच पाहिजे. ब्रिटनमध्ये थॅचरबाईंनी मुस्लिमांचे लाड चालू दिले नाहीत , असा पंतप्रधान आपल्याला हवा ‘ , असे ते म्हणाले.

काश्मीर , गोध्रा , सोलापूर येथे हिंदू मारले जात असताना , त्या ठिकाणी भेटायला सोनिया गांधी जात नाही. पण कुठे मुस्लिम दंगलीत अथवा दुर्घटनेत ठार झाले तर या बाई निश्चितपणे तिथे जातात. अमेरिकेतील पाद-याने भाष्य केल्यानंतर कोणत्याही मुस्लिम राष्ट्रात काही घडत नाही , पण सोलापुरात दंगल होते. नंतर पादरी माफी मागतो!

‘ बुश यांना बराच वेळ फोन करून थकलो. मला येणा-या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सभेला जाऊ की नको , असे त्यांना विचारणार होतो. बुश म्हणाले की , इराकवर हल्ला करण्याची आधी परवानगी देणार असाल तर जा ‘ , अशी भाषणाची मिश्किल सुरुवात करून श्री. ठाकरे म्हणाले ‘ , ३६ वर्षांपासून शिवसैनिकांच्या आशीर्वादाने या पदावर आहे. मला धक्का लावून बघा. सारा देश उसळेल. शिवसैनिक व देवदैवत हेच माझे संरक्षण असल्यामुळे मी धमक्यांना भीक घालत नाही.

[ Saturday, October 09, 2004 10:32:34 pm]

 

म. टा. प्रतिनिधी , ठाणे

स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या खंडू खोपड्यांसारख्या फितुरांना छत्रपतींनी कधीही माफ केले नाही. त्याचप्रमाणे आज शिवशाहीशी गद्दारी करणाऱ्या फितुरांना खड्यासारखे दूर ठेवा , असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवारी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत येथे केले.

बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू असल्याने त्यांच्या या सभेकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. खणखणीत आवाजात बाळासाहेबांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला. बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्याच आक्रमक शैलीत विरोधकांवर प्रहार केले. मात्र , कधी नव्हे ते त्यांनीही आज आपल्या भाषणांची टिपणे काढून आणली होती. सेंट्रल मैदानावर झालेल्या या सभेला तुडुंंब गदीर् होती. सारा परिसर भगव्या झेंड्यांनी फुलला होता.

विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपत आला तरी बाळासाहेबांची अद्याप एकही सभा न झाल्याने शिवसेनेच्या प्रचारात नेहमीची रंगत नव्हती. या सभेने शिवसेनेच्या प्रचारात जोष आणला. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य छायाचित्राबरोबरच मीनाताई ठाकरे व आनंद दिघे यांचीही छायाचित्रे होती.

स्वातंत्र्यानंतरच्या 55 वर्षांपैकी आमची पाच वषेर् वगळता काँग्रेसवाल्यांनीच सत्ता उबवली. या 50 वर्षांत विकासाच्या ऐवजी भकासच देशाच्या वाट्याला आला , असा घणाघाती हल्ला शिवसेनाप्रमुखांनी केला.

सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या तर आपण मंत्रिमंडळात गेलो नसतो , असे पवार आज सांगतात. मुळात तुम्ही तिथे गेलातच कशासाठी , या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला द्या , असे आव्हान बाळासाहेबांनी त्यांना दिले. विदेशीपणाचा मुद्दा घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडलात. आता हा विदेशीपणाचा डाग धुवून काढायला कोणता साबण मिळाला , असे बाळासाहेबांनी विचारताच हास्याचे स्फोट झाले.

इटलीहून आलेली ही बाई आपल्याला , तिरंगा हृदयात असायला पाहिजे , हे शिकवते आणि तुम्ही मुर्दाडासारखे ते सहन करता , याची मला आता कीव येऊ लागली आहे , अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.

सत्तेवर असताना काँग्रेसकडे चिक्कार पैसा होता त्यावेळी सभेला गदीर् जमविण्यासाठी किती पैसे द्यायचे , याचे हिशेब चालत. आता माझ्यासमोर जी गदीर् आहे , तिच्यातील एकाला जरी सभेला येण्यासाठी पैसे दिले असतील , तर त्याने इथे व्यासपीठावर येऊन सांगावे , असे आव्हान त्यांनी दिले.

इलेक्ट्रॉनिक मशिन्समध्येही घोटाळे होऊ शकतात , या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मतदान संपल्यानंतर त्या मशिन्सच्या सर्व वायर्स काढल्याशिवाय तेथून हलू नका , असा आदेशच आपण पोलिंग एजंट्सना दिला आहे , असे ते म्हणाले.

मंत्रालयावर भगवा फडकवण्याची जबाबदारी मी तुमच्या खांद्यावर टाकत आहे , माझा विश्वास सार्थ करा , असे भावनिक आवाहनही ठाकरे यांनी अखेरीस केले

[ Sunday, October 10, 2004 11:23:08 pm]

 

म. टा. प्रतिनिधी

मुंबईचा शांघाय करायचा असेल तर करा , पण मुंबई स्वतंत्र करण्याचा प्रयत्न झाल्यास नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही , असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क येथे शिवसेना भाजप युतीच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत दिला.

मुंबईत ‘ बी फॉर बांगलादेश ‘ कदापि होऊ देणार नाही. मुर्दाडांसारखे आम्ही थंड बसणार नाही , असेही त्यांनी स्पष्टपणे सुनावले.

ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणामुळे या निवडणुकीत राज्यात दौऱ्यावर जाता आले नसले , तरी शनिवारी ठाण्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत विरोधकांची खिल्ली उडवत सभेवर ताबा मिळवला. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात शरद पवार , सोनिया गांधी , लालूप्रसाद यादव यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केली.

केंद सरकारने आता जे जनगणनेचे आकडे जाहीर केले आहेत. त्यात हिंदू 19 टक्के , मुस्लिम 12 टक्के आहेत. मात्र 35 टक्के बांगलादेशीय असून मुंबईत त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबई ही श्ाीमंताची नाही. येथे धनदांडग्यांची मस्ती चालणार नाही. मुंबई ही शिवसैनिकांची आणि मराठी माणसांची आहे. 60 लाख झोपडी-धारकांना आधी सुविधा द्या. 1995 पर्यंत जे जे मुंबईत आले आहेत. ते सर्व मुंबईकर आहेत. 1995 पूवीर् व नंतर मुंबईत आलेल्या बांगला-देशीयांना लाथ मारायला हवी , असे ते म्हणाले.

विदर्भाच्या दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हृदयात तिरंगा आहे , असे सांगतात. याचा उल्लेख करून ठाकरे यांनी सोनियांच्या आवाजाची नक्कल केली तेव्हा उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. अडवाणी , अटलबिहारी या नावाचे शेतकरी दाखवा असे शरद पवार आपल्या भाषणांमध्ये रोज सांगत असतात. पण पॅरिसहून कपडे धुऊन आणणारे पं. नेहरू , इंदिरा गांधी , राजीव गांधी आणि सोनिया गांधी हे काय शेतकरी आहेत ? यांच्या हाताचे नांगर हे लोकांच्या घरावर चालतात. पवारांचे महाराष्ट्रात स्थान काय तर हुजरेगिरी , मुजरेगिरी असा टोला त्यांनी लगावला. हे आधुनिक मराठा शरद पवार दोन दोन मिनिटांनी सोनिया गांधी यांच्यापुढे झुकतात. हा मराठा जातीला कलंक आहे , अशी टीका त्यांनी केली. आता या बाई ‘ रोड शो ‘ करणार आहेत. यापूवीर् आम्ही असे प्रकार केले असून त्यामुळे आपण असे रोडावलो आहोत. आता सोनिया गांधी यांनी विदर्भात जाऊन काही आश्वासने दिली आहेत. पण आमचा वचननामा असतो. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो , असे त्यांनी सांगितले.

केंदीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्यावर त्यांनी तुफान टीका केली. अय्यर हे अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या ‘ मण्यार ‘ सापासारखे आहेत. सावरकर यांच्याविषयी घृणास्पद उद्गार काढणाऱ्या अय्यर यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू दिले जाणार नाही , असे ते म्हणाले.

ठाकरे यांच्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण झाले. ‘ प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश ‘ घडविण्यासाठी सर्वार्ंनी प्रतिज्ञा करा , असे आवाहन त्यांनी मराठीतून केले. देशाची स्थिती बिघडत असून देश तोडणाऱ्या शक्ती प्रबळ होत आहेत. या देशाच्या अनमोल आझादीला अबाधित राखण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे व त्याची नांदी महाराष्ट्रापासून सुरू होणार आहे. युतीला सत्तेवर आणण्यासाठी नेटाने प्रयत्न करा , असे त्यांनी सांगितले.

 

 

हा ढाण्या वाघ मेलेला नाही!
23 Jan 2008, 0236 hrs IST 

 मेल  Discuss  शेअर  सेव    
 
[ Saturday, October 23, 2004 12:17:19 am]

 

म. टा. प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्ही खचलात का , अशी साद घातली आणि तमाम शिवसैनिकांकडून ‘ नाही…नाही ‘ चा गजर झाला…तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले , पराभवाने खचून जाणारा हा वाघ नाही , हा ढाण्या वाघ आहे , तो मेला नाही , त्याला जखमी करण्यात आले आहे , हा जखमी झालेला वाघ एक ना एक दिवस पुन्हा त्वेषाने झेप घेतल्याशिवाय राहणार नाही , अशी गर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात केली. चंदिका केनिया , मुकेश पटेल , राम जेठमलानी , प्रीतीश नंदी यांसारख्या अनेक परप्रांतियांना शिवसेनेेचे राज्यसभेवर पाठविले , आज उत्तर प्रदेश , बिहारमध्ये एक तरी मराठी मंत्री झाला का , असा सवालही त्यांनी , ‘ वर्षानुवषेर् येथेच राहणाऱ्या परप्रांतियांच्या विरोधात नाही ‘, याचा खुलासा देताना केला.

ढाण्या वाघ पिंजऱ्यात अडकलेला दिसतो , म्हणून त्याला वाकुल्या दाखवून चिडवू नका , बिबळ्या बाहेर पडला की काय होते , हे तुम्हा मुंबईकरांना माहितीच आहे , शिवसेनेच्या बिबळ्याने पंजा मारून पिंजरा तोडला आणि बाहेर आला तर त्याच्या अंगावर जेवढे ठिपके असतात , त्यापेक्षा जास्त ठिपके तुमच्या कपड्यांवर पडलेले दिसतील , असा इशारा त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर थोड्याच दिवसांत झालेल्या या सभेत शिवसेनाप्रमुख किती जहाल बोलतात , याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पराभव किती तरी पचवलेत , त्यांनी आम्ही खचलेलो नाही , अशी सुरुवात करून शिवसेनाप्रमुख म्हणाले : मी आजारी पडलो , म्हणून. मी सभा घेतल्या असत्या , तर आणखी किमान 10 जागा नक्की निवडून आणल्या असत्या. आम्ही परप्रांतियांच्या विरोधात असतो , तर या सर्वांना राज्यसभेवर पाठविले असते का ? चंदिका केनिया यांचे नावही त्यावेळी कुणी ऐकले नव्हते , तेव्हा त्यांना प्रथम राज्यसभेवर पाठविले. आमचे दि. बा. पाटील यांची संधी नाकारून अडवाणी , वाजपेयी यांचा निरोप आल्यामुळे राम जेठमलानी यांना राज्यसभेवर पाठविले. पण ते कृतघ्न निघाले.

लालूंच्या बिहारमध्ये लहान मुलांनाही गोळ्या झाडून मारले जाते. कल्याणमध्ये परप्रांतियांबद्दल जो प्रकार घडला , तो राग आमचा परप्रांतियांविरुद्ध नव्हता , रेल्वे खात्याविरुद्ध होता. त्यांनी भरतीची जाहिरात उत्तर प्रदेश , बिहारमध्ये छापली , पण मराठी वृत्तपत्रांत छापली नाही. जाहिरात छापूनही मराठी उमेदवार आले नसते , तर ठीक आहे. पण सत्य दडपण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही , असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईमध्ये 1995 चा कायदा सर्व जाती-धर्म-प्रांतियांना लागू आहे. पण मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे , तर संपूर्ण देशात आम्ही बांगलादेशीय मुस्लिमांना टिकू देणार नाही. त्या पद्धतीने आम्ही आंदोलन सुरू! सत्ता काय आज आहे , तर उद्या नाही. आमच्या सत्तेच्या काळात आम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी असताना 9 हजार बांगलादेशीयांच्या विरुद्ध कारवाई केली होती. पण ज्योती बसू यांनी त्यांना बंगाली समजून परत महाराष्ट्रात धाडले.

व्यासपीठावर उद्धव ठाकरे , मनोहर जोशी यांच्याबरोबरच राज ठाकरे यांचीही उपस्थिती ठळकपणे जाणवत होती.

 

4 responses to “हिंदु हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांची काही गाजलेली भाषणे

 1. Ramesh Babaji Bhawar

  जानेवारी 20, 2011 at 2:26 pm

  thank you saheb

   
  • विशाल कुलकर्णी

   जानेवारी 24, 2011 at 12:14 pm

   धन्यवाद कशाबद्दल, तो आपला महत्वाचा ठेवा आहे, शेअर करणे माझे कर्तव्य होते म्हणुन केले 🙂
   आभार 🙂

    
 2. nitin pingle

  मे 17, 2014 at 12:01 pm

  Saheb tumhi parat ya….

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: