RSS

पोपट झाला रे !

11 ऑगस्ट

परवा दिवशी सकाळी ऑफीसमध्ये आलो तेच एकावर एक धक्के खात.
नेहमीप्रमाणे गेटवर बाईक थांबवली आणि एकदा हॉर्न देवुन वाट बघत बसलो.
आमचा सिक्युरिटी गार्ड गेट सोडुन कुठेही असु शकतो. त्यामुळे रोजची सवय झालीय आता , हॉर्न द्यायचा आणि गाडी बंद करुन त्याची वाट बघत बसायचे. परवा दिवशी मात्र हॉर्न वाजवला आणि साहेब हजर….
मी अवाक वगैरे झालो…,” किशनजी आज तबियत तो ठिक है आपकी?” तो आपला उगीचच हसला..
” का करे साहब, हम तो नामका सिक्युरिटी गारड हु, बाकी काम तो सब करने पडत है हिया!
पर आजसे हम पहले हॉरनपे मिलुंगा आपको…ईस्टिरिक्ट वारनिंग मिला है….कोई बडा गोरा साबलोग आने वाला है !”
मी खुशीतच वर आलो..चला सुधारणेला वाव आहे….निदान गोर्‍या साहेबासाठीका होईना बदल होताहेत..
हे ही नसे थोडके……………………….!

वर माझ्या क्युबिकलपाशी आलो तर प्युन शोधत आला,” विशालसर तुम्हाला समाद्दारसाहेब शोधत होते”
कमांडर समाद्दार, आमचे पर्सनल कम अँडमिन मँनेजर…मी थेट त्यांना जावुन भेटलो…
विशाल तुम्हारा अपने क्युबिकलको लेकर कोइ कंप्लेंट हो तो अभी बोल दो..फोन, कंपुटर (ते काँम्प्युटरला कंपुटर म्हणतात).जो भी हो अभी बता दो… मन्डेको क्लास वेस्टर आ रहा है ! that time every thing should be fine. आमच्या कंपनीच्या हेड क्वार्टर्सहुन एक अँड्व्हायजरी बोर्डाचं पँनेल येणार होतं. आणि “क्लास वेस्टर” हा समग्र फ्युग्रो ग्रुपचा चेअरमन आहे. मला एकदम गहिवरुन वगैरे आलं….तो क्लास वेस्टर समोर असता तर त्याला मनातल्या मनात कडकडुन मिठी मारली असती मी. (मनातल्या मनात एवढ्यासाठी कि तो पुर्ण फ्युग्रो ग्रुपचा बाप आहे..त्याच्या पुढे माझी उंची कमी पडली असती…दोन्ही अर्थाने… )
पण मी लगेच लिस्ट करायला घेतली….
१. दिड महिन्यापासुन बंद असलेला फँन (आमचा एसी वीज बचतीचा पुरस्कर्ता आहे)
२. वारंवार लटकणारा (हँग होणारा) संगणक
३. १८५७ मधले डस्टबिन
४. डोक्यावर लटकणार्‍या विजेच्या तारा
५. मधुनच असहकार पुकारणारा टेलिफोन सेट
बरंच काही होतं हो……

लिस्ट अँडमिन डिपार्टमेंटला दिली आणि पुढची सुचना ऐकुन ” क्लास वेस्टर ला शिव्या घालायला सुरुवात केली. लिस्ट दिली हो पण पण एसी चालु असेलच किंवा फँन सुरु होईलच याची शाश्वती नाही आणि हे सांगताहेत please be well dressed,( म्हणजे सुट आणि टाय घालुन या दोन दिवस हा गर्भितार्थ)
मग आमची घरात (सुशिक्षित बेकाराप्रमाणे) पडिक असलेला सुट शोधण्यापासुन सुरुवात…..
(लग्नातला नाही हो….त्यानंतर परवाच्या मे मध्ये शिवला होता..हॉलंडला जाताना. (मी पण जावुन आलोय हो !) मग त्याच्या ड्रायक्लिनिंगपासुन तयारी….(१५० रुपये, माझी एक महिन्याची एरियल आली असती तेवढ्यात…इति सौभाग्यवती). आणि मी चक्क बुट पॉलिश करुन घेतले. कधी नव्हे ती पार्लरला….. जावुन दाढी केली तिही फेशिअल सहित.

सोमवारी सकाळी सुट घातला आणि आईसाहेबांनी सांगितलं.. टाय प्रेस करुन घे रे.. छान हाताने धुतलाय मी..मशिनला नाही टाकला. तुम्हा आजकालच्या लोकांना कष्टच करायला नको. (हा पुष्पगुच्छ आमच्या सौं. साठी होता) मी आधी किचनकडे नजर टाकली (घाबरत घाबरत) . ह्यां…..तिचं लक्षच नव्हतं….हे निश्चित झाल्यावर मग कपाळावर हात मारला. आणखी एक टाय शहीद झाला…मी मनोमन त्याला (आणि ३७५ रुपयांना) श्रद्धांजली वाहुन रिकामा झालो. सुट घालुन बाईकवर कसं जायचं म्हणुन चक्क घरापासुन रिक्षाने ऑफीसला आलो. (नशीब आमच्या घरापासुन टँक्सी स्टँड खुप लांब आहे. [उगीचच आपलं काटकसरीपणाचं समर्थन (कोण रे तो..कंजुष म्हणणारा) ] .

ऑफीसमध्ये आलो तर सगळीकडे अनोळखी माणसं दिसायला लागली. साहजिक आहे म्हणा, आम्हाला ‘क्रिश’ मधला हृतिक बघायची सवय….लक्ष्य पाहताना अनोळखी वाटणारच की ! पण सगळं कसं ग्वाड वाटत होतं. नेहमी चप्पल घालुन फिरणारे प्युनसुद्धा टाय मध्ये….!
“शोभा कितने बजे आ रहे है वो लोग?”
विशाल, तेरा अगला जनम बुक नही हुवा है ना अभी, मेरा क्लेम पहिला है, याद रखना…..हे मात्र अन्यायी होतं हा…अगला जनम क्युं?……………हे ही मनातच, प्रत्यक्षात मात्र,” अगं बाई, माझी बायको दर वर्षी वडाची पुजा करते गं.” आम्ही पापभिरु ना?…..[पापभिरु म्हणजे नक्की काय..पापाची भीती वाटणे की भीती वाटते म्हणुन पाप न करणे?]
अर्थात, ती काय मागते हे तिलाच माहित..बहुदा..पुढच्या वर्षी हाच जर आला तर पुजा करणे सोडुन देइन अशी धमकी देत असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

शोभा मैने तुमसे कुछ पुछा है…….(सात्विक वगैरे संताप, का सगळं मनातच बोलावं लागतं याचा राग?)
दो बजे के बाद ही आयेंगे यार, क्यु टेंशन लेता है?.. इति शोभा
“एक काम कर आजका दिन ये सुट पहनके मेरी सिटपे बैठ जा, मै तेरी जगा पे ऑपरेटर बन जाता हु आज . हे देखिल मी मनातच म्हटलं…कारण नेमकी ती कधी नव्हे ते साडी नेसुन आलेली. आणि तिला सुट दिल्यावर मी काय घालु….साssssssssssss ! नो वे ?

आधी दोन वाजले…शोभाचा बझ आला..विशाल..वो लोग आ गये…………..!
आम्ही पटापट टेबल वगैरे आवरुन तयार..ऑफीसच्या इमारतीत दोन स्वतंत्र सेक्शन आहेत, प्रोजेक्ट आणि अँप्लिकेशन. आम्ही अँप्लिकेशनवाले..त्यामुळे आमचा नंबर थोडा उशीरा होता. सगळे सजवलेले बकरे वाट पाहात होते. त्याच्या येण्याची नव्हे….येवुन जाण्याची. कारण वर व्यक्त केलेल्या शंकेप्रमाणे एसी ठिक झालेला नव्हताच आणि डोक्यावरच नुकताच रिपेअर केलेला पंखाही घायकुतीला येवुन हातघाई करत होता.
त्यामुळे कधी एकदा सगळं संपतंय असं झालं होतं.
(मला सांगण्यात आलं होतं.. कंपुटर रिपेअरके लिये कोटेशन मंगवाया है, तब तक तुम अपना लँपटॉप निकालके टेबलपे रख देना… म्हणजे रिपेअर्स..वाट बघा! असं….)

तीन वाजले….वो लोग लँब मे है….कभी भी तुम्हारे डिपार्टमेंट्मे आ सकते है….. इति श्रुती.. secretary to MD.

तीन पस्तीस…
विशाल, वो लोग यार्ड मे है…च्यायला आम्हाला बहुतेक संध्याकाळपर्यंत तंगवणार..इति मि.सुर्या, Sr. Engineer, Projects.

चार वीस…( चार शे वीस साले, फुकट पिळताहेत)
विशाल, वो लोग अब कँटीन देख रहे है….अगला पडाव शायद अँप्लिकेशन ही होगा….इति आलोक, Lab Engineer.

पाच वाजुन पंधरा मिनीटे….
शोभाचा फोन….

विशाल, वो लोग बाहर निकल रहे है………………………..?

विशालच्या बैलाला ssssssssssssssssssss हो ssssssssssssssssssssss!

vishal

विशाल कुलकर्णी

 

5 responses to “पोपट झाला रे !

 1. स्वागता

  एप्रिल 13, 2011 at 12:04 सकाळी

  सही रे! सही!

   
 2. vikram

  एप्रिल 13, 2011 at 10:35 सकाळी

  mastach 🙂

   
 3. Priya

  नोव्हेंबर 11, 2011 at 3:34 pm

  hehe kiti rupayee vaya gele overall?

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: